शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्करी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 20:47 IST

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असणाऱ्या तेलंगाणा राज्याच्या सीमेमधून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, ती तातडीने रोखण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिसांना दिले.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे निर्देशपोलीस विभागासोबत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असणाऱ्या तेलंगाणा राज्याच्या सीमेमधून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, ती तातडीने रोखण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिसांना दिले.यासंदर्भात नागपूर व अमरावती विभागाच्या पोलीस महानिरीक्षक व संबंधित विभागातील पोलीस अधीक्षकांची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना अहीर यांनी उपरोक्त माहिती दिली. या आढावा बैठकीदरम्यान गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, नक्षलविरोधी अभियान विभागाचे पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, सी.आर.पी.एफ. चे उप महानिरीक्षक शेखर, बी.एस.एन.एल. च्या मोबाईल नेटवर्किंग विभागाच्या महाव्यवस्थापिका नम्रता तिवारी, नागपूर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, नागपूर ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तसेच नागपूर परिमंडळातील पोलीस उपआयुक्त संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व आर्णीचे आमदार राजू तोडसाम उपस्थित होते.अहीर यांनी सांगितले की, तेलंगणामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच खान्देशमधून होणारी पशुधन तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाला स्थानिक वाहतूक विभागाकडून मदत मिळावी, यासाठी आपण सूचना दिल्या आहेत. आढावा बैठकीमध्ये नागपूर-अमरावती विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, बी.एस.एन.एल.चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नक्षलगस्त भागात मोबाईल टॉवरची क्षमता वाढवागडचिरोली मधील नक्षलग्रस्त भागात मोबाईल नेटवर्कच्या क्षमता वाढीसाठी त्याचे ४ जी तंत्रज्ञानामध्ये अद्ययावतीकरण, टॉवर्सची उंची वाढवणे इत्यादी संदर्भात आपण बी.एस.एन.एल.च्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. गडचिरोलीच्या ज्या क्षेत्रामध्ये टॉवर्स लावण्यासाठी अडचणी येत होत्या त्यादेखील पोलीस यंत्रणेने दूर केल्या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या पोलीस जवान, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांना चांगली मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहितीही केंद्री गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी दिली.एका गोळीचे उत्तर १०० गोळ्यांनीपाकिस्तानकडून सतत सिसफायरचे उल्लंघन होत आहे. शिवाय आतंकवाद्यांच्या हल्ल्यामुळे काश्मीर धगधगत आहे. यावर बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर म्हणाले की, भारतीय जवानांकडून सडेतोड उत्तर दिले जात असून पाकिस्तानच्या एका गोळीचे उत्तर १०० गोळ्यांनी दिले जात असल्याचे सांगितले. शिवाय चीनवर बोलताना द्विपक्षीय संबंधात सुधारणा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरministerमंत्री