शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

म्हाडाच्या भूखंडांवरील अतिक्रमण रोखा

By admin | Updated: June 22, 2015 02:57 IST

म्हाडाच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : रामगिरीत घेतला आढावा नागपूर : म्हाडाच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हाडाच्या विविध वसाहतीतील समस्या व उपाययोजना सुचविण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. बैठकीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. प्रकाश गजभिये, म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, पोलीस आयुक्त एस.पी. यादव, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक संदीप जोशी, मुख्य अधिकारी प्रदीपकुमार डांगे प्रामुख्याने उपस्थित होते. भामटी-परसोडी येथील बहुमजली इमारतीतील गाळ्यांचे वैयक्तिक वारसा अभिहस्तांतरण करून देण्यासाठी म्हाडाच्या कायद्यात बदल करावा. येत्या विधिमंडळ अधिवेशनात प्रस्ताव आणावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत भामटी-परसोडी, सोमलवाडा, डिव्हिजनल को-आॅपरेटिव्ह सोसायटी, रामबाग वसाहत, शिघ्रसिद्ध, गणकदर याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी बिलाच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता असलेल्या रामबाग, शांतिनगर, रिजरोड, राजे रघुजीनगर, बोरगाव, सोमवारी पेठ, नंदनवन या म्हाडा वसाहतीची समस्या १ डिसेंबर २०१५ पूर्वी सोडवावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. खापरी येथील म्हाडा वसाहतीमध्ये राहणाऱ्या गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्यात यावा. कारण ही जागा मिहान प्रकल्पात गेल्यामुळे जवळच बहुमजली इमारत उभारून गाळे धारकांना द्यावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत केली. आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले यांनीही म्हाडासंदर्भात विविध सूचना केल्या. (प्रतिनिधी)