शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

-तर उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप

By admin | Updated: July 6, 2017 02:25 IST

कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात चालढकल केल्यास शहरावर डेंग्यूचा हल्ला होण्यास वेळ लागणार नाही,

हायकोर्टाने व्यक्त केली भीती कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक मनपाला कधी येईल जाग ? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात चालढकल केल्यास शहरावर डेंग्यूचा हल्ला होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित प्रकरणावरील सुनावणीदरम्यान व्यक्त केली. तसेच, कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काय झाले, अशी विचारणा मनपाला करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. शहरातील अस्वच्छतेसंदर्भात पुनम प्राईड कन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा व व्यावसायिक अनिल आग्रे यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शहरातील विविध भागांतील कचऱ्याची छायाचित्रे न्यायालयाला दाखविण्यात आली. तसेच, कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनी कचऱ्याची पूर्णपणे उचल करीत नसून त्यांच्यावर मनपाचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन शहरातील अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली. मनपाला फटकारून यावर स्पष्टीकरण मागितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.