शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अनुदान घोटाळ्यातील शाळा संस्थाचालकांवर कारवाई थांबविण्यासाठी दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 20:58 IST

१२ शाळांनी नियमबाह्य अनुदान लाटल्याप्रकरणी विधान परिषदेत हे प्रकरण उचलण्यात आले होते. तेव्हा सभागृहाने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. परंतु या चौकशीतून संस्थाचालकांना वगळण्यात यावे, यासाठी १४ मे २०१८ रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक आमदार, शिक्षण उपसचिव, शिक्षण उपसंचालक, सहसंचालक, शिक्षणाधिकारी, अधीक्षक यांचा समावेश होता. या बैठकीत १२ शाळांच्या संस्था चालकांविरुद्ध अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी करण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमंत्रालयस्तरावर झाली बैठक : शिक्षकांवरही गारपीट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १२ शाळांनी नियमबाह्य अनुदान लाटल्याप्रकरणी विधान परिषदेत हे प्रकरण उचलण्यात आले होते. तेव्हा सभागृहाने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. परंतु या चौकशीतून संस्थाचालकांना वगळण्यात यावे, यासाठी १४ मे २०१८ रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्थानिक आमदार, शिक्षण उपसचिव, शिक्षण उपसंचालक, सहसंचालक, शिक्षणाधिकारी, अधीक्षक यांचा समावेश होता. या बैठकीत १२ शाळांच्या संस्था चालकांविरुद्ध अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी करण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला.तीन कोटी रुपयांचा हा अनुदान घोटाळा संस्थाचालक व अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आला. यात दोषी आढळलेल्या १२ शाळा २०१३-१४ मध्ये केवळ अनुदानास पात्र ठरल्या होत्या. या शाळांचे अनुदान २०१६ मध्ये सुरू झाले. असे असताना स्थानिक अधिकारी व संस्थाचालकांनी २५ जून २०१३ व ३० नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयात परस्पर बदल करून २०१३-१४ पासून ६० टक्के अनुदान लाटण्यात आले. या प्रकरणाची तक्रार होईपर्यंत अनुदानाची रक्कम तीन कोटीच्या जवळपास पोहचली होती. शिक्षण आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यापूर्वी विधान परिषदेत हे प्रकरण उचलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यात सभागृहाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या माध्यमातून चौकशी करण्यास सांगितले होते. परंतु १४ मे २०१८ रोजी झालेल्या बैठकीत संस्थाचालकांची चौकशी लाचलुचपत विभागामार्फत करण्यात येऊ नये, तर शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांची मात्र चौकशी करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबाव आणण्यात येत असल्याचे दिसते आहे.दरम्यान या १२ शाळेतील चौकशी पूर्ण होईपर्यंत या अनियमिततेमध्ये समाविष्ट असलेल्या शाळांतील तुकड्या, पदे व त्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन थांबविण्यात यावे, यासंदर्भातही बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात समाविष्ट असलेल्या ५० शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहे. मी रुजू झाल्यानंतर २०१६ मध्ये अनुदान देणे सुरू होते. हे अनुदान २०१४ पासून सुरू होते. त्यामुळे या प्रकरणात माझी कुठलीही भूमिका नाही.दीपेंद्र लोखंडे, माजी शिक्षणाधिकारी, जि.प. नागपूर चौकशी अहवालात शाळानिहाय अपहारभवानी माता उच्च प्राथमिक शाळा भरतवाडा - २६,८६,२७५ रुपयेएन.एस.व्ही.एम. फुलवारी प्राथ. शाळा मराठी वैशालीनगर - २७,२५,९६५ रुपयेएन.एस.व्ही.एम. फुलवारी प्राथ. शाळा हिंदी वैशालीनगर - २६,०४,११४ रुपयेसंत गीता माता प्राथ. शाळा भरतवाडा - २७,३३,३१७ रुपयेमाँ भवानी हिंदी प्राथ. शाळा - ३३,१३,०४१ रुपयेस्व. श्यामराव देशमुख प्रा. शाळा हिंगणा - १८,५२,८२० रुपयेकश्मीर विद्या मंदिर, विनोबा भावेनगर - ८०,६६,५४४ रुपयेगुरुप्रसाद प्राथमिक शाळा वाडी - ६,५२,६७८शांतिनिकेतन प्राथमिक शाळा राजीवनगर - १८,०८,४३५अमित उच्च प्राथमिक शाळा, नरसाळा - १३,३१,९००श्रीमती भगवतीदेवी चौधरी, सोनेगाव - ९,८४,४७१गजानन प्रसाद उच्च प्राथमिक शाळा, सर्वश्रीनगर - ७,७७,३२२

 

टॅग्स :fraudधोकेबाजीEducationशिक्षण