शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली

By admin | Updated: September 15, 2015 05:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना

वसीम कुरैशी ल्ल नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली. वैमानिकाने या घटनेची तक्रार हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वायूसेनेकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी ५.४२ च्या सुमारास राष्ट्रपतींचे विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानासमोर आठ डुक्कर आले. पण वैमानिकाने आपल्या उत्तम कार्यक्षमतेचा परिचय देत दुर्घटना टाळली. मनपाच्या शतकोत्तर समारंभात उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वायूसेनेच्या विमानाने सोमवारी नागपुरात दाखल झाले. अतिविशेष व्यक्तीच्या विमानासाठी धावपट्टीवर सक्षम सुरक्षा नसल्याचे पाहून वैमानिक नाराज झाल्याची माहिती आहे. या विमानाच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी वैमानिकावर असते. विमानतळावर डुकरांची हजेरी विमानासाठी धोक्याची घंटा होती.धावपट्टीवर डुक्कर आले कसे? हा एक गंभीर मुद्दा आहे. यापूर्वी लोकमतने धावपट्टीवर प्राण्यांचा वावर असल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा भिंत तुटली असून काही जागी उंची फारच कमी आहे. याशिवाय आतील भागात दाट झाडे आहेत. यामुळेच काही महिन्यांआधी एकजण भिंत ओलांडून धावपट्टीजवळ आला होता. विमानासाठी डुक्कर धोकादायकया क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठे डुक्कर विमानासाठी धोकादायक ठरू शकतात. राष्ट्रपतींच्या हवाई यात्रेसाठी बोर्इंग-७३७ विमानाचा उपयोग करण्यात आला. विमान सुरू असताना जवळील प्राणी टर्बाईन अथवा इंजिन ओढते. त्यामुळे इंजिन नादुरुस्त होऊन आग लागण्याची जास्त शक्यता असते. आजच्या घटनेत डुक्कर विमानाच्या समोरील चाकात आले असते तर विमान दुर्घटनाग्रस्त झाले असते. ‘एमआयएल’वर होऊ शकते कारवाईवर्ष २००८ पासून विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. धावपट्टीच्या कडेला पक्ष्यांना हटविण्यासाठी जोल गन बसविली आहे. याशिवाय प्राण्यांना धावपट्टीवर येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी सोलर फेन्सिंग लावली आहे. त्यानंतरही डुक्कर धावपट्टीवर आले. राष्ट्रपतींचा वैमानिक वायूसेनेचा अधिकारी असतो. त्याने केलेली तक्रार हे गंभीर प्रकरण आहे. तक्रारीच्या आधारे मिहान इंडियावर कारवाईची दाट शक्यता आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे कंपनीला द्यावी लागणार आहेत. खा. दर्डा यांनी वारंवार वेधले लक्ष अशा प्रकारच्या घटना नागपूर विमानतळावर यापूर्वीही घडलेल्या आहेत. खा. विजय दर्डा यांनी संसदेत तसेच संसदेच्या नागरी हवाई वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये नागपूर विमानतळावरील सुरक्षाविषयक मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या आगमनाप्रसंगी जर अशी घटना घडत असेल तर सामान्य प्रवाशांच्या बाबतीत विमानतळ प्रशासन किती दक्ष आहे, हे यावरून दिसून येते.