शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांसाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच

By admin | Updated: August 22, 2014 01:32 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. परंतु भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदामुळे या पक्षांच्या नेत्यांनी

पडद्याआड हालचाली : राष्ट्रवादीकडून जुन्या समीकरणाची चाचपणी?नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. परंतु भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदामुळे या पक्षांच्या नेत्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.सर्वच पक्षात या पदासाठी इच्छुकांची भरमार असली तरी, जि.प.तील संख्याबळ विचारात घेता स्वबळावर कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष शक्य नाही. सर्वाधिक २२ सदस्यसंख्या असलेल्या भाजप व १९ सदस्य असलेल्या काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. २० सप्टेंबरला निवडणूक असल्याने भाजप-शिवसेनेच्या बहुसंख्य सदस्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची स्वप्ने पडत आहे. वेळप्रसंगी बंडाची तयारी आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तूर्त कुणाच्याही नावाची शिफास न करता विधानसभा निवडणुकीत मदत होईल. अशाच सदस्यांची शिफारस भााजप आमदार करणार आहेत.भाजपच्या शुभांगी गायधने, कल्पना चहांदे, निशा सावरकर, शकुंतला हटवार व अरुणा मानकर आदी अध्यपदाच्या शर्यतीत आहेत. शिवसेनेच्या भारती गोडबोले व वर्षा धोपटे यांचीही नावेही चर्चेत आहे. गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या वादातून निशा सावरकर व भारती गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतली होती. काँग्रेसचे संख्याबळ १९ आहे. बहुमतासाठी त्यांना ११ सदस्यांची गरज आहे. राष्ट्रवादीचे सात, बसपा, आरपीआय व शिवसेना बंडखोर असे तीन सदस्य काँगे्रेससोबत येण्याची शक्यता गृहित धरली तरी आघाडीचे संख्याबळ २९ पर्र्यंतच जाते. त्यामुळे गोगपा वा शिवसेनेच्या बंडखोर सदस्याला हाताशी धरून जि.प.ची सत्ता काबीज करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु राष्ट्रवादीने अद्याप पत्ते ओपन केलेले नाही. दुसरीकडे युतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची सदस्य संख्या आठ असूनही या पक्षाच्या वाट्याला उपेक्षाच आली. राष्ट्रवादीला उपाध्यक्ष व शिक्षण सभापती अशी महत्त्वाची पदे तर शिवसेनेच्या वाट्याला महिला बालकल्याण व कृषी अशी खाती देण्यात आली. जि.प.च्या ५९ सदस्यांत भाजप- शिवसेनेचे ३० संख्याबळ आहे. पण सेनेच्या पुष्पा देशभ्रतार काँग्रेससोबत असल्याने युतीची सत्ता अडचणीत आली आहे. याही परिस्थितीत गोगपासोबत राहिल्यास सत्ता समीकरण जुळते. परंतु शिवसेनेच्या बंडखोर सदस्याला अध्यक्षपद द्यावे लागेल. अशावेळी भाजप सदस्य बंडखोरी करण्याची शक्यता आहे. वेळप्रसंगी दगाफटका होण्याची शक्यता असल्याने सत्ता टिकविण्यासाठी युतीच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय पर्याय नसल्याने सध्याचेच समीकरण कायम ठेवण्याचा भाजप नेत्यांचा विचार आहे. (प्रतिनिधी)