भारतीय संस्कृती, निसर्गातील आपलेपणा आणि देशविदेशातील उत्तमोत्तम कलाशैलींचा समावेश असणाऱ्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या द्विदिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी १९ ऑक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले
नागपुरात हिरेजडित दागिन्यांच्या वैविध्यपूर्ण शृंखलेचा नजराणा सादर
ठळक मुद्दे‘इन्ट्रिया’चे उद्घाटन : दिवाळीच्या पर्वावर प्रत्येकाची हौस भागवणारे प्रदर्शन‘रोझ गोल्ड’ दागिन्यांतून होणार भारतीय कलाविष्काराचे दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृती, निसर्गातील आपलेपणा आणि देशविदेशातील उत्तमोत्तम कलाशैलींचा समावेश असणाऱ्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या द्विदिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी १९ ऑक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी या नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या प्रमुख शिल्पकार व इन्ट्रियाच्या भागीदार प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी आणि दुसरे भागीदार हिरे व्यापारी हर्निश सेठ उपस्थित होते.लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन रविवार, २० ऑक्टोबरपर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजतापर्यंत आहे. पूर्वा दर्डा-कोठारी व हर्निश सेठ यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांची ही नवी मालिका म्हणजे प्रत्येक खरेदीदारासाठी आपुलकी निर्माण करणारी आहे. दीपावलीस आता आठच दिवस राहिले असताना, त्याच पार्श्वभूमीवर आयोजित हे प्रदर्शन दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याची संधी प्रदान करणारे आहे. उद्घाटनप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, डॉ. रवी गांधी, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्ष माधुरी बोरा, दीपक देवसिंघानी, किरण दर्डा, अनुराधा झंवर, दिशा अग्रवाल, रितू जैन, डॉ. शैला गांधी, रिचा बोरा, उषा सुराणा उपस्थित होते.वजनाने हलके, दर्जेदार अन् चकाकी दीर्घकाळाचीप्रदर्शनात असलेल्या इन्ट्रियाचे दागिने वजनाने अत्यंत हलके आहेत. मात्र, या दागिन्यांचा लुक भारदस्त आहे. केवळ विवाह, पार्टी आदी सोहळ्यांतच नव्हे तर कुटुंबात रमतानाही हे दागिने घालण्यास अवघड नाहीत. हे दागिने घडविण्यासाठी अत्यंत उच्च दर्जाचे हिरे उपयोगात आणण्यात आले आहेत. आज घेतलेले दागिने पुढची अनेक वर्षे अगदी सुरुवातीला होते, तसेच राहणारे आहेत. या व्यावसायिक मूल्यांमुळेच इन्ट्रियाची शृंखला नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे.निसर्ग आणि भारतीय संस्कृतीचा अनुपम मेळहे दागिने म्हणजे भारतीय सांस्कृतिकतेचे दर्शन घडविणाऱ्या कलाविष्कारांचा उत्तम असा नमुना आहेत. या सर्व दागिन्यांमध्ये ‘रोझ गोल्ड’चा समावेश असून, हे दागिने अतिशय देखणे आहेत. यात भारतीय संस्कृतीसोबतच निसर्गातील मूल्यांचा अनुभव दिसून येतो. हे सर्व दागिने लेटेस्ट फॅशनचे असून, भेटवस्तू देण्यासाठी आणि आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी मोलाचे ठरणारे आहेत. हिरे, माणिक, मोती, रुबी यांचा समावेश असलेले महिलांसाठी नेकलेस, पेंडंट, इअररिंग, रिंग्ज, ब्रेसलेट तर पुरुषांसाठी कफलिंग्ज, हिऱ्याचे दागिने, बटन्स, पेन इथे सादर करण्यात आले आहे. एकंदर प्रत्येक दागिन्यांची प्रत्येक रेंज वैविध्यपूर्ण प्रकारात सादर आहे.डिझाईन्समध्ये ‘इन्ट्रिया’ला तोड नाहीमुंबई येथे इन्ट्रियाचे स्टुडिओ असून, तेथेच नाविन्यपूर्ण शैली विकसित केल्या जात असल्याचे इन्ट्रियाच्या भागीदार व प्रमुख डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांनी सांगितले. देश-विदेशात प्रवास करणे हा माझा छंद आहे आणि याच छंदाचा उपयोग करून त्या त्या भागातील निसर्ग, तेथील शैली मी माझ्या दागिन्यांमध्ये उतरवत असते. हाँगकाँग येथील डिझाईन्सचे आकर्षण अनेकांना आहे आणि मीसुद्धा तेथील डिझाईन्सचा अभ्यास करत असते. त्यामुळेच, आज इन्ट्रियाद्वारे सादर करण्यात येत असलेल्या अतिशय विलोभनीय शृंखलेला ज्वेलरी क्षेत्रात तोड नाही. उत्तमात उत्तम अशी ज्वेलरी असल्यामुळेच, नागरिक इन्ट्रियाकडे अपेक्षेने बघतात. येथेही रुबी, साऊथी सी पर्ल्स, येलो सफरचे दागिने आकर्षित करत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येकाला दागिन्यांची ही शृंखला पाहून स्वप्नवत वाटत असल्याचे अनुभव मी ऐकत असल्याचे पूर्वा दर्डा-कोठारी यांनी सांगितले.