शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

वर्तमानात जगणे शिकवणारा तिबेटीयन चित्रपट ‘द कप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:33 IST

प्रत्येक क्षण आनंदाने जगावे. म्हणजेच भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार न करता वर्तमानात कसे जगावे, याची उत्तम शिकवण देणारा तिबेटीयन चित्रपट म्हणजे ‘द कप’. दीक्षाभूमीवर आयोजित बुद्ध महोत्सवाला शनिवारी थाटात सुरुवात झाली. ‘द कप हा चित्रपट यावेळी दाखवण्यात आला.

ठळक मुद्देचित्रपट महोत्सव : दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक क्षण आनंदाने जगावे. म्हणजेच भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार न करता वर्तमानात कसे जगावे, याची उत्तम शिकवण देणारा तिबेटीयन चित्रपट म्हणजे ‘द कप’. दीक्षाभूमीवर आयोजित बुद्ध महोत्सवाला शनिवारी थाटात सुरुवात झाली. ‘द कप हा चित्रपट यावेळी दाखवण्यात आला.द कप हा तिबेटीयन भाषेतील चित्रपट आहे. रिनपोचे या जगविख्यात दिग्दर्शकने हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाने स्क्रीन इंटरनॅशनल पुरस्कारही पटकावला आहे.दोन तिबेटीयन भाऊ पळून भारतात येतात. हिमाचल प्रदेशातील एका बुद्ध मॉनेस्ट्रीमध्ये ते राहू लागतात. दोन्ही भाऊ अतिशय खोडकर असतात तर मॉन्स्ट्रीचे शिक्षक भिक्खू हे अतिशय शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे असतात. फुटबॉलचा वर्ल्ड कप सुरू होणार असतो. दोन्ही भाऊ फुटबॉलसाठी अतिशय वेडे असतात. त्यांना वर्ल्ड कप पाहायचा असतो परंतु मॉनेस्ट्रीमध्ये टीव्ही नसतो. तेथील शिक्षकांचीही त्याला परवानगी नाही. दोन्ही मुलासोबत राहून मॉनेस्ट्रीमधील इतर सर्व मुलांनाही फुटबॉलचे आकर्षण वाढते. त्यांनाही वर्ल्ड कपचे सामने पाहायचे असतात. मग दोन्ही भाऊ एकेक पैसे जमा करतात. डीश अ‍ँन्टीना आणतात आणि सर्वजण मिळून फुटबॉलचे सामने टीव्हीवर पहातात. फुटबॉलचा वर्ल्ड कप पाहण्यासाठी या मुलांची सुरू असलेली धडपड पाहून अखेर टीचरही त्यासाठी तयार होतात. आपले नियम बाजूला ठेवून तेही सामन्यांचा आनंद घेतात, अशी ही या चित्रपटाची कथा आहे. भाषा समजत नसली तरी भावस्पर्शी कथानकाने नागपूरकर रसिकांच्याही मनात चित्रपटाने हात घातला.तत्पूर्वी डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. सुनील तलवारे, धम्मचरी ऋतायुष, अश्विन कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. अजय ढोके यांनी भूमिका विषद केली. पायल ढोके यांनी संचालन केले. स्मिता जाधव यांनी आभार मानले.आज ‘द बॅटल आॅफ भीमा कोरेगाव ’चित्रपट महोत्सवात १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘द बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. सोमनाथ वाघमारे यांनी हा चित्रपट तयार केला आहे. चित्रपटापूर्वी सोमनाथ वाघमारे हे नागपूरकर रसिकांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत दुपारी दुपारी ३ वाजता जपान देशात नोकरीच्या संधी याविषयावर कार्यशाळा होईल.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीcultureसांस्कृतिक