शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:15 IST

दोन्ही विमान आधी लँडिंगच्या तयारीत होती; पण धावपट्टीच्या अगदी जवळ गेल्यावर अचानक इंजिनचा वेग वाढला आणि विमान थेट आकाशात परत गेले.

नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी अचानक दाट धुक्याने झाकलेले आकाश आणि क्षीण झालेली दृश्यता यामुळे थरारक क्षण निर्माण झाले. इंडिगोच्या बंगळुरू-नागपूर आणि मुंबई-नागपूर या दोन विमानांनी धावपट्टीपर्यंत झेप घेतली होती, मात्र रनवे स्पष्ट न दिसल्याने दोन्ही वैमानिकांना तातडीने ‘गो-अराऊंड’ करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अचानक आकाशात पुन्हा झेपावलेल्या विमानांनी प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला. काही क्षणांसाठी विमानात सन्नाटा पसरला, अनेकांच्या मनात अनिष्ट कल्पना डोकावल्या. काहींना नुकतीच झालेली अहमदाबाद दुर्घटना आठवली. दोन्ही विमानांच्या लँडिंगला तब्बल २० ते २५ मिनिटांचा उशीर झाला. अखेर, दुसऱ्या प्रयत्नात दोन्ही विमाने सुखरूपपणे धावपट्टीवर उतरली आणि प्रवाशांनी सुटकेचा मोठा नि:श्वास टाकत विमानतळावर पाऊल ठेवले.

अचानक इंजिनचा वेग वाढला!

दोन्ही विमान आधी लँडिंगच्या तयारीत होती; पण धावपट्टीच्या अगदी जवळ गेल्यावर अचानक इंजिनचा वेग वाढला आणि विमान थेट आकाशात परत गेले. त्यामुळे प्रवाशांचे धाबे दणाणले. काही जणांना थरारकच वाटले.

दोन विमानांचे दुसऱ्यांदा लँडिंगइंडिगोचे ६ ए ६००३ हे बेंगळुरू-नागपूर विमान सकाळी ६:५० वाजता आणि ६ई-५३४९ मुंबई-नागपूर विमान सकाळी ७:२० वाजता नागपूर विमानतळावर उतरणार होते; परंतु कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकांना विमान पुन्हा आकाशात न्यावे लागले. दोन्ही विमानांनी २० ते २५ मिनिटे आकाशात घिरट्या घातल्यानंतर धावपट्टीवर सुखरूप उतरले. या नैसर्गिक अडथळ्यामुळे विमानातील प्रवाशांना काही काळ धक्का बसला. बेंगळुरू-नागपूर विमान सकाळी ७:१० वाजता आणि मुंबई-नागपूर विमान सकाळी ७:५० वाजता उतरले. ही दोन्ही विमाने एअरबस ३२० निओ विमानाद्वारे चालविली जातात. 

२० ते २५ मिनिटे विमानाच्या हवेत घिरट्याजवळपास २० ते २५ मिनिटे विमान हवेत घिरट्या घालत राहिले आणि शेवटी दोन्ही विमाने वैमानिकाच्या कुशलतेमुळे सुखरूपपणे धावपट्टीवर उतरले. प्रवाशांनी उतरल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडला; पण भीतीचा अनुभव त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवून गेला. ही घटना काहीशी अहमदाबाद विमान दुर्घटनेची आठवण करून देणारी होती.

टॅग्स :IndigoइंडिगोAirportविमानतळ