शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण योजना तयार करा

By admin | Updated: May 16, 2017 02:14 IST

मिहान प्रकल्पातील हजारो प्रकल्पग्रस्तांसाठी महानिर्मितीतर्फे राबविण्यात येणारी प्रशिक्षण योजना मिहानमध्ये राबवण्याचे निर्देश ..

पालकमंत्री बावनकुळे यांचे मिहानला निर्देश : माफक दरात घरांची योजना तयार करण्याच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मिहान प्रकल्पातील हजारो प्रकल्पग्रस्तांसाठी महानिर्मितीतर्फे राबविण्यात येणारी प्रशिक्षण योजना मिहानमध्ये राबवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिहानचे प्रबंध संचालक काकाणी यांना दिले.मुंबईत मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत हे निर्देश देण्यात आले. शासनाने नुकतेच खापरी पुनर्वसनासाठी १०० कोटी दिले आहेत. पण प्रशासकीय अधिकार नागपूरच्या अधिकाऱ्यांना नसल्यामुळे या निधीचा उपयोग होत नाही. यासाठी प्रबंध संचालकांनी तीन दिवस नागपूरला द्यावेत व मिहानमधील प्रकल्पग्रस्तांच्या लहान लहान समस्या निकाली काढाव्या, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.नुकताच पालकमंत्र्यांनी मिहानमधील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने जनता दरबार आयोजित केला होता. या उपक्रमात हजारो नागरिकांनी लेखी स्वरूपात आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. या अर्जावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याचेही पालकमंत्र्यांनी सूचित केले.खापरी या गावात ८०० घरे आहेत. यापैकी ५०० घरांचे पुनर्वसन झाले. ३०० घरे शासकीय जागेवर आहेत. या ३०० जागांसाठी माफक दरात घरांची योजना तयार करून या नागरिकांचे पुनर्वसन करा. मिहानमध्ये जाणाऱ्या चार गावांपैकी तीन गावांचे पुनर्वसन झाले आहे. तसेच शिवणगाव हे शहरात आहे. शिवणगावच्या नागरिकांना चिंचभुवन येथे जागा दिली. रस्ते बांधले पण पुनर्वसनाच्या अन्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. डिजिटल शाळेचे टेंडर काढा व ४०० कुटुंबे शासकीय जागेवर आहेत त्यांच्यासाठी माफक दरात घरांची योजना तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.मिहानमध्ये आलेल्या कंपन्यांना ४.४० रुपए प्रति युनिट प्रमाणे स्वस्त वीज दिली आहे. पण या कंपन्यांनी एकाही प्रकल्पग्रस्ताला अजून नोकरी दिली नाही. प्रकल्पग्रस्तांना व स्थानिक तरुणांना या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली पाहिजे. प्रकल्पग्रस्तांसाठी महानिर्मितीने तयार केली त्याप्रमाणे प्रशिक्षण योजना तयार करा म्हणजे या प्रकल्पग्रस्तांना वयाच्या ५८ वर्षापर्यंत काम करता येईल असेही पालकमंत्री म्हणाले.