शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिहान प्रकल्पग्रस्तांसाठी महानिर्मितीसारखी प्रशिक्षण योजना तयार करा

By admin | Updated: May 15, 2017 20:17 IST

मिहान प्रकल्पातील हजारो प्रकल्पग्रस्तांसाठी महानिर्मिती तर्फे राबविण्यात येणारी प्रशिक्षण योजना मिहानमध्ये राबवण्याचे निर्देश

ऑनलाइन लोकमत                               नागपूर, दि. 15 - मिहान प्रकल्पातील हजारो प्रकल्पग्रस्तांसाठी महानिर्मिती तर्फे राबविण्यात येणारी प्रशिक्षण योजना मिहानमध्ये राबवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिहानचे प्रबंध संचालक काकाणी यांना दिले.मुंबईत मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत हे निर्देश देण्यात आले. शासनाने नुकतेच खापरी पुनवर्सनसाठी 100 कोटी दिले आहेत. पण प्रशासकीय अधिकार नागपूरच्या अधिकाऱ्यांना नसल्यामुळे या निधीचा उपयोग होत नाही. यासाठी प्रबंध संचालकांनी तीन दिवस नागपूरला द्यावेत व मिहानमधील प्रकल्पग्रस्तांच्या लहान लहान समस्या निकाली काढाव्या, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.नुकताच पालकमंत्र्यांनी  मिहानमधील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने जनता दरबार आयोजित केला होता. या उपक्रमात हजारो नागरिकांनी  लेखी स्वरूपात आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. या अर्जावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक समस्यां सोडवण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याचेही पालकमंत्र्यांनी सूचित केले.खापरी या गावात 800 घरे आहेत. यापैकी 500 घरांचे पुनर्वसन झाले. 300 घरे शासकिय जागेवर आहेत या 300 जगांसाठी माफक दरात घरांची योजना तयार करून या नागरिकांचे पुनवर्सन करा. मिहानमध्ये जाणाऱ्या 4 गावांपैकी 3 गावांचे पुनर्वसन झाले आहे. तसेच शिवणगाव हे शहरात आहे. शिवनगावच्या नागरिकांना चिचभुवन येथे जागा दिली. रस्ते बांधले पण पुनवर्सनाच्या अन्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. डिजिटल शाळेचे टेंडर काढा व 400 कुटुंबे शासकीय जागेवर आहेत त्यांच्यासाठी माफक दरात घरांची योजना तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.मिहानमध्ये आलेल्या कंपन्यांना 4.40 रूपये प्रति युनिट प्रमाणे स्वस्त वीज दिली आहे. पण या कंपन्यानी एकाही प्रकल्पग्रस्ताला अजून नोकरी दिली नाही. प्रकल्पग्रस्तांना व स्थानिक तरूणांना या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली पाहिजे. प्रकल्पग्रस्तांसाठी महानिर्मितीने तयार केली त्याप्रमाणे प्रशिक्षण योजना तयार करा म्हणजे या प्रकल्पग्रस्तांना वयाच्या 58 वर्षापर्यंत काम करता येईल असेही पालकमंत्री म्हणाले.