शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसाठी आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:20 IST

संत्रानगरीची शान असलेल्या अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा, असा मोठा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी धरण सुरक्षा संघटनेला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश धरण सुरक्षा संघटनेला दिली १५ एप्रिलपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रानगरीची शान असलेल्या अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा, असा मोठा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी धरण सुरक्षा संघटनेला दिला.सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शाहीद शरीफ जमशेद शरीफ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे अंबाझरी तलावाला धोका निर्माण झाला, असा दावा केला होता. न्यायालयाने हा आदेश देऊन सदर याचिका निकाली काढली. अंबाझरी तलावाच्या सुरक्षा भिंतीपासून मेट्रो रेल्वेचा मार्ग गेला. त्यासाठी सुरक्षा भिंतीच्या पायथ्याशी खोल खोदकाम करून मोठमोठे पिलर उभे केले जात आहेत. धरण सुरक्षा संघटनेने सांगितलेल्या सात सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या अटीवर महापालिकेकडून मेट्रो रेल्वेला अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, निश्चित आराखडा असल्याशिवाय सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या जाऊ शकत नसल्याची बाब लक्षात घेता, उच्च न्यायालयाने धरण सुरक्षा संघटनेला सदर आदेश दिला. धरण सुरक्षा संघटनेकडे तज्ज्ञ अभियंते आहेत. त्यामुळे त्यांनी अंबाझरी तलावाच्या सुरक्षेकरिता आराखडा तयार करावा. यासाठी आवश्यकता वाटल्यास महापालिका, मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील अधिकारी व तज्ज्ञाचे सहकार्य घ्यावे, असे न्यायालयाने सांगितले. मेट्रो रेल्वे अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी ३४२ मीटरपर्यंत बांधकाम करणार आहे. त्यामुळे एवढ्या परिसरातील सुरक्षाविषयक कामांचा खर्च मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तर, उर्वरित कामांचा खर्च राज्य सरकारने करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता एम. जी. भांगडे व अ‍ॅड. अरुण पाटील, मेट्रो रेल्वेतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एस. के. मिश्रा व कौस्तुभ देवगडे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

पैशांवरून राज्य सरकारला तंबीअंबाझरी तलाव १४५ वर्षे जुना आहे. या तलावाचे संवर्धन शहराकरिता अत्यावश्यक आहे. त्यामुळे सुरक्षाविषयक कामांसाठी पैसे नसल्याचे कारण खपवून घेतले जाणार नाही. यासाठी राज्याचे मुख्य सचिव सर्वस्वी जबाबदार राहतील, अशी तंबी न्यायालयाने दिली आहे.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलाव