शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कृती आराखडा सज्ज ठेवा - विजयलक्ष्मी बिदरी

By आनंद डेकाटे | Updated: May 31, 2024 19:51 IST

मान्सुनपूर्व तयारीचा आढावा, वैनगंगा नदीवरील संजय सागर तसेच तेलंगाना राज्यातील मेडीगट्टा या प्रकल्पातून पाणी सोडतांना समन्वय ठेवण्याच्या दृष्टिने आंतरराज्य बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नागपूर : हवामान खात्याने विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही तसेच बाधित होणाऱ्या गावांसाठी विशेष कृती आराखडा तयार करुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.जिल्हा व तालुकास्तरावर महसूल, जलसंपदा, आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नियंत्रण कक्ष तयार करुन तात्काळ मदतीसाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून मतदकार्यासाठी नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी बिदरी यांनी दिले.

नागपूर विभागातील मान्सूनपूर्व नियोजनाचा आढावा शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे, वायुसेना, आर्मी, भारतीय हवामान खाते, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षाच्या पावसाळ्यात ज्या गावांना पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली होती अशा गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने आर्मी, एयरफोर्स तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ या यंत्रणांनी सज्जता ठेवावी. जिल्हाधिकारी यांनी मागणी करताच जलद गतीने बचाव कार्य सुरु करता येईल. गडचिरोली जिल्ह्यातील १२० पेक्षा जास्त गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो तसेच भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यातही अशा प्रकारची परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून महसूल विभागाने सज्जता ठेवावी अशी सूचना केली.

वैनगंगा नदीवरील संजय सागर तसेच तेलंगाना राज्यातील मेडीगट्टा या प्रकल्पातून पाणी सोडतांना समन्वय ठेवण्याच्या दृष्टिने आंतरराज्य बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पावर नियंत्रणासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सिंचन प्रकल्पातून पाणी सोडतांना नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी. त्यानुसार यंत्रणा सज्ज ठेवणे सोयीचे होईल. सिंचन विभागातर्फे नियंत्रण कक्षाद्वारे विभागातील सर्व प्रकल्पांच्या जलसाठ्याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाला नियमित सादर करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.असे आहेत निर्देश- पावसासंबंधी पूर्व सूचना सर्व समाजमाध्यमाद्वारे द्यावी- साथीचे आजार होणार नाही यादृष्टिने नियोजन करावे- नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.- पावसाळ्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक- आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी नियमीत भेट देवून तपासणी करावी.- आरोग्य विभागाने रॅपिड रिस्पॉन्स टिम तयार करुन ज्या भागात साथीच्या रोगाचे प्रमाण आढळून येईल अशा भागांना भेट देवून आरोग्य तपासणी करावी.- आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावे.- सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांची मान्सुनच्या दृष्टिने विशेष दुरुस्ती करावी- रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी विशेष कृती आराखडता तयार करावा.- महानगरपालिकांनी नाले सफाईला प्राधान्य देवून मान्सुन येण्यापूर्वी पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही याची दक्षता घ्यावी