शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर स्मारकाचा आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:53 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक धंतोली येथील पटवर्धन ग्राऊंड येथे व्हावे, यासाठी वाढीव जागेच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : धंतोलीतील वाढीव जागेच्या प्रस्तावाला मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक धंतोली येथील पटवर्धन ग्राऊंड येथे व्हावे, यासाठी वाढीव जागेच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या स्मारकासंदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची बैठक झाली. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके, बहुजन समाज पक्षाचे गटनेते महम्मद जमाल, जितेंद्र घोडेस्वार, महेश नागपुरे तसेच नगरसेवक उपस्थित होते.गेल्या महिन्यात महापालिका सभागृहात काँग्रेसचे मनोज सांगोळे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. बसपाच्या नगरसेवकांनी आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मुद्यावरून सभागृहात धुमाकूळ घातला होता. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी बसपाच्या नगरसेवकांना यासंदर्भात पुढील सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम चांगल्या पद्धतीने होईल. या स्मारकाच्या बांधकामासंदर्भातील आराखडा संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर तयार करावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. स्मारकाबाबतच्या आजवरच्या फाईल्स मागविण्यात आल्या आहेत. तत्कालीन सरकारने यात त्रुटी ठेवल्या आहेत. त्या दूर करून सुधारित आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आर्किटेक्ट अशोक मोखा यांच्याकडे आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.