शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात मृत्यू रोखण्यासाठी तीन वर्षाचा कृती आराखडा तयार करा

By आनंद डेकाटे | Updated: January 22, 2025 16:26 IST

मुख्य सचिव सुजाता सौनिक : रस्तासुरक्षा संदर्भात नागपूर-अमरावती विभागाचा आढावा

आनंद डेकाटे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  : रस्ते अपघात टाळण्यासोबतच शुन्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी येत्या तीन वर्षाचा जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करून प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी संबंधित विविध यंत्रणांना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर व अमरावती विभागातील रस्ते सुरक्षा तसेच अपघात नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात मुख्य सचिव सौनिक यांनी बुधवारी आढावा घेतला. रस्त्यावरील शुन्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी सेव्हलाईफ फाऊंडेशनसह विविध संस्थांसोबत वर्ष २०२८ पर्यंतचा कृती आराखडा तयार करावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, पोलीस उपायुक्त वाहतूक अर्चित चांडक तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्याचे वाहतूक आयुक्त विवेक भीमनवार, सेव्हलाइफ फाऊंडेशनचे पियुष तिवारी उपस्थित होते.

सकाळी ६ ते १० व रात्री ६ ते ९ यावेळात अपघात टाळण्यासाठी हे करा

  • राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक, अपघात प्रवण स्थळाच्या ठिकाणी रस्ते विभाजक, साईनबोर्ड तात्काळ लावा.
  • वेग मर्यादा, हेल्मेट व सिटबेल्ट यासारख्या आवश्यक सूचना देतांनाच नागरिकांमध्ये जनजागृती करा
  • अपघातानंतर गोल्डन अव्हरमध्ये वैद्यकीय सुविधा व उपचार तातडीने उपलब्ध होईल यादृष्टीने अशा रूग्णालयांची नोंदणी करण्याला प्राधान्य द्या
  • रस्त्यावरील तसेच फुटपाथ वरील अतिक्रमण तात्काळ काढा
  • अंधार असलेल्या रस्त्यांवर विद्युत व्यवस्था, वेग मर्यादेसाठी आवश्यक उपाययोजनेसह आवश्यक मार्गदर्शक फलक लावा
  • यासाठी परिवहन व महानगरपालिकांने विशेष दक्षता घ्यावी यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आवश्यक निधी उपलब्ध करून घ्यावा

 विदर्भात रस्ता अपघातातात सरासरी तीन टक्के कमी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी यावेळी नागपूर-अमरावती विभागात रस्त्यावरील अपघातांमध्ये सरासरी तीन टक्के कमी झाल्याची माहिती दिली. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत असून रस्तेसुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे. परिवहन विभागातर्फे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते सुरक्षा समितीच्या सुचनेनुसार प्राधान्याने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यात अपघातात २.२२ टक्केपर्यंत कमीजिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सादरीकरणाद्वारे नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघात कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने कमी होत असून २.२२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मदत झाली आहे. यासाठी मुख्यरस्त्यांवर आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात मदत झाली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरात २३ अपघात प्रवण स्थळांपैकी १८ ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्यामुळे सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत अपघात कमी झाले आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ४७ कोराडी नाका ते भारत माता चौक, जामठा टि पॉइंट, राष्ट्रीय महामार्ग ५३ उमिया आदींचा समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूर