शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ही तर तिसऱ्या लाटेची तयारी; बाजारातील अनियंत्रित गर्दीमुळे चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:12 IST

Nagpur News कोविड संक्रमण नियंत्रणात आल्याने नागपूर शहरातील दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सोबतच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; परंतु बाजारात प्रचंड गर्दी होती.

ठळक मुद्देनियंत्रणाची एनडीएसवर जबाबदारीनियम तोडल्यास दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड संक्रमण नियंत्रणात आल्याने नागपूर शहरातील दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सोबतच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; परंतु बाजारात प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात काही दुकानदारांनी सायंकाळी पाचपर्यंत वेळ असताना उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवली. याचा विचार करता उपद्रव शोध पथकाला (एनडीएस) शहरातील प्रमुख बाजार असलेल्या सीताबर्डी, महाल, इतवारी, खामला, जरीपटका, सक्करदरा आदी भागांतील गर्दी नियंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार आर्थिक दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सीताबर्डी, महाल, इतवारी बाजारात मंगळवारीही गर्दी दिसून आली. दुकानांतील गर्दीसोबत कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. नियमांचे कठोर पालन झाले नाही, तर पुन्हा संक्रमण वाढण्याचा धोका आहे. याचा विचार करता मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. दुकाने, हॉटेल, रेस्टाॅरंट आदींना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिला आहे.

... तर निर्बंध लावले जातील

अनलॉकनंतर पहिल्याच दिवशी बाजारात मोठी गर्दी होती. याचा विचार करता कोविड संक्रमण फार काळ नियंत्रणात राहणार नाही, असा धोका असल्याने दर शुक्रवारी अनलॉकचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या भागात नियमांचे पालन होणार नाही. अशा परिसरात निर्बंध लावावे लागतील, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

आठवडाभर ठेवणार नजर

सुरुवातीला काही दिवस बाजारातील गर्दी, दुकानदारांकडून नियमांचे पालन होते की नाही, यावर प्रशासनाची नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास निर्बंध लावण्याची तयारी करावी लागेल. यामुळे सर्वांना नियमांचे पालन करावेच लागेल, असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.

सुपर स्प्रेडर्सची चाचणी आवश्यक

दुकानातील कर्मचारी, ठेलेवाले, रेस्टाॅरंट व हॉटेलमधील कर्मचारी, हॉकर्स, भाजीपाला विक्रेते आदींना कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. सोबतच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स अशा नियमांचे पालन करावे लागेल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस