शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता सर्वेक्षणासाठी पर्यायी व्यवस्थेची तयारी

By admin | Updated: July 5, 2017 02:15 IST

शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण सप्टेंबर २०१७ पर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निर्धारित केले आहे.

सर्वेक्षणाची गती संथ : नवीन कंपनीला काम देण्याचा प्रस्तावलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण सप्टेंबर २०१७ पर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निर्धारित केले आहे. परंतु यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मे. सायबर टेक अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेडच्या कामाची गती संथ असल्याने निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नवीन कंपनीवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. मे. सायबर टेक कंपनीकडे १० सप्टेंबर २०१५ मध्ये शहरातील सहा लाख मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली होती. १८ महिन्यात हे काम पूर्ण करावयाचे होते. परंतु या कंपनीला हे शक्य झाले नाही. आजवर २ लाख ५४ हजार ९३६ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. वास्तविक महापालिके च्या नोंदीनुसार शहरात ५ लाख ६० हजार ४२ मालमत्ता आहेत.अजूनही शहरातील ३ लाख मालमत्तांचे सर्वेक्षण शिल्लक आहे. तीन महिन्यात सर्वेक्षण शक्य नसल्याने नवीन कंपनी नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. सायबर टेक कंपनीला प्रती मालमत्ता १२० रुपये प्रमाणे मोबदला दिला जात आहे. शुक्रवारच्या बैठकीत दरामध्ये तांत्रिक सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार १२० रुपये प्रती मालमत्ताऐवजी १२० रुपये प्रती युनिटच्या आधारावर दर निश्चित करण्याचा विचार आहे. सायबर टेक कंपनीकडून सर्वेक्षणाचे काम पूर्ण न झाल्यास त्याच दराने मे. अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेडने सर्वेक्षण करण्याची तयारी दर्शविली आहे. या बाबतच्या प्रस्तावावर समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. करारानुसार सायबर टेक कंपनीने निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण न केल्यास महापालिका या कंपनीवर कारवाई करू शकते. त्यांची अनामत रक्कम जप्त करून बिल थांबविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमरावती काळ्या यादीतसायबर टेक कंपनीला अमरावती शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण न केल्याने अमरावती महापालिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. या निर्णयावर कंपनीने न्यायालयातून स्थगनादेश आणला आहे. आर्थिक नुकसान झाल्याने अमरावती महापालिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते.