नागपुरात  एमडीची तस्करी करणारे प्रेमीयुगुल जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:48 AM2019-04-24T00:48:31+5:302019-04-24T00:49:04+5:30

गुन्हे शाखेच्या पथकाने एका प्रेमीयुगुलाला एमडी (मेफेड्रॉन) पावडर नामक अमली पदार्थाची तस्करी करताना पकडले.

Premiere arrested who smuggled MD in Nagpur | नागपुरात  एमडीची तस्करी करणारे प्रेमीयुगुल जेरबंद

नागपुरात  एमडीची तस्करी करणारे प्रेमीयुगुल जेरबंद

Next
ठळक मुद्दे३६ ग्राम एमडी जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने एका प्रेमीयुगुलाला एमडी (मेफेड्रॉन) पावडर नामक अमली पदार्थाची तस्करी करताना पकडले. विजय धनराज वंजारी (वय ३२, रा. न्यू कॉलनी, मंगळवारी बाजार) आणि पायल शंकर चरडे (वय २४, रा. कुंभारपुरा बगडगंज), अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३६ ग्राम एमडी जप्त करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, पायल मूळची जबलपूरची रहिवासी असून विजय प्रॉपर्टी डीलिंग करायचा. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांना एमडीचे व्यसन लागले. व्यसनपूर्ती तसेच दोघांचा खर्च भागविण्यासाठी विजयने प्रॉपर्टी डीलिंग सोडून एमडीची तस्करी सुरू केली. पायलही त्यात गुंतली. त्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पंटरच्या माध्यमातून या दोघांवर नजर ठेवली. रविवारी हे दोघे एमडीची खेप घेऊन दुचाकीने निघाल्याचे कळताच, त्यांना सेंट्रल एव्हेन्यूवरील आजमशहा चौकात पकडण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे ३६ ग्राम एमडी पावडर, ३०० रुपये आणि मोबाईल मिळाले. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत १ लाख ८ हजार रुपये आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात एनडीपीएसचे पोलीस निरीक्षक राजू बहादुरे, सहायक निरीक्षक शशिकांत पाटील, एएसआय अविनाश तायडे, हवालदार संतोष ठाकूर, विनोद मेश्राम, अजय ठाकूर, नितीन रांगणे, राहुल गुमगावकर, सचिन सेलोकर, अमोल पडधान आणि कुंदा जांभूळकर यांनी ही कामगिरी बजावली
दोन दिवसात तीन कारवाया
गुन्हे शाखेची दोन दिवसातील तिसरी कारवाई होय. शनिवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अनमोल सिद्धार्थ खोब्रागडे (वय ३२) याला जेरबंद केले. त्याच्याकडून ८१ हजार रुपये किमतीचे २७ ग्राम मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आले. तर मृणाल गजभिये नामक आरोपीला अटक करून त्याच्याकडून सीताबर्डी पोलिसांनी रविवारी एमडी पावडर जप्त केले होते.

Web Title: Premiere arrested who smuggled MD in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.