लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी प्रीती दासचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. न्या. बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने हा निर्णय सुनावला. या निर्णयाने प्रीती दासला धक्का बसला. न्यायालयाने आरोपाचे स्वरूप व प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट केले. प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत अर्जदाराला जामीन देणे योग्य ठरणार नाही. आरोपीने १३ जूनला स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलाने केला. त्यानंतर धारा ४२० व ३८४ अंतर्गत आरोपीला कारागृहात टाकण्यात आले. त्याच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रारही १० महिने उशिरा देण्यात आली आणि चौकशीही जवळजवळ पूर्ण झालेली आहे. त्यामुळे अर्जदाराला जामीन देण्यात यावा, असे नमूद करण्यात आले. यादरम्यान सरकारची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी आरोपीवर असलेले आरोप गंभीर असून प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याने आरोपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाची बाजू ऐकत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
प्रीती दासचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 00:04 IST