शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

‘फलोदी बाजार’च्या अंदाजांचा झाला ‘फालुदा, सटोड्यांचे अंदाज धुळीत

By योगेश पांडे | Updated: December 4, 2023 05:20 IST

सर्वसाधारणत: सट्टाबाजारात अंदाजाच्या आधारे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो

नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या निकालानंतर केवळ काँग्रेसलाच नव्हे, तर सट्टाबाजारालादेखील मोठा धक्का बसला. बहुतांश ‘एक्झिट पोल्स’ आणि सट्टाबाजारातील अंदाज अक्षरश: धुळीला मिळाले. राजस्थानमधील ‘फलोदी’ बाजाराच्या आधारावर अनेकांनी विविध कयास वर्तवीत सट्ट्याचे भाव बदलले होते. मात्र, निकालानंतर या सगळ्या भाकितांवर पाणी फेरले गेले. सट्टाबाजारातील अंदाजावर डोळे बंद करून विश्वास करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. छत्तीसगडच्या धक्क्यामुळे एकीकडे सट्टा लावणाऱ्यांच्या खिशातून पैसा गेला असला तरी बुकी मात्र मालामाल झाले.

सर्वसाधारणत: सट्टाबाजारात अंदाजाच्या आधारे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणूक निकालांवरदेखील भरभरून सट्टा लावला गेला. फलोदीच्या आकड्यांकडे सटोड्यांचे लक्ष लागले होते. तेथील आकडेवारीने राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येत असल्याचे स्पष्ट केले होते, तर मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपमध्ये काट्याची टक्कर व छत्तीसगडमध्ये काँग्रेसला झुकते माप दिले होते. त्याच्या आधारावर लोकांनी काँग्रेसच्या विजयावर कोट्यवधी रुपये लावले. एक्झिट पोलच्या दिवशी सट्टाबाजार खुलला अन् लगवाडी खयवाडीही सुरू झाली, तर निकालाच्या एक दिवस अगोदर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या अंदाजापेक्षा थोड्या अधिक येतील असे भाकीत वर्तविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आणि पैसे लावणाऱ्यांचे धाबे दणाणले. विशेषत: छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर तर अनेकांना घाम फुटला. एकीकडे सट्टेबाज कंगाल झाले तर बुकी मात्र मालामाल झाले.

आता मुख्यमंत्रिपदावर सट्टाबाजार गरमदरम्यान, निकालानंतर सट्टाबाजार मुख्यमंत्रिपदाच्या नावांवरून गरम झाला आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, अर्जुन मेघवाल यांची नावे आघाडीवर आहेत. सट्टाबाजारात वसुंधरा राजे यांना झुकते माप देण्यात आले आहे. दुसरीकडे छत्तीसगड व मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रिपदाच्या नावांवरूनदेखील सट्टा सुरू झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३