शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व आरटीओचे कामकाज ठप्प

By admin | Updated: May 28, 2017 02:27 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी

इंटरनेट सेवा बंद : अनेक जण रिकाम्या हाताने परतले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी व उमेदवारांच्या सोयीसाठी ‘सारथी ४.०’ बरोबरच ‘वाहन ४.०’ कार्यान्वित करण्यात आले. मात्र संथ गतीच्या या प्रणालीमुळे गैरसोयींचे प्रमाणच दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इंटरनेट सेवाच बंद पडल्याने सर्वच कामे ठप्प पडली. कार्यालयाने इंटरनेटचे मासिक बिल न भरल्याने ही सेवा खंडित करण्यात आल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. नागपुरातील तीनही आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ ही नवी ‘वेब बेस’ प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीमध्ये शिकाऊ वाहन परवाना व पक्क्या वाहन परवानासाठी लागणाऱ्या ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’सह इतरही अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत डाऊनलोड करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परंतु जेव्हापासून ही प्रणाली सुरू झाली आहे, तेव्हापासून आरटीओ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी व अर्जदाराला विविध समस्यांमधून जावे लागत आहे. या प्रणालीला सुरू होऊन दोन-तीन महिन्यांचा कालावधी होत असताना सुरळीत झालेली नाही. याचा फटका सामान्यांना बसत आहे. काहींवर कार्यालयाच्या खेट्या मारण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवहन विभागाचे सचिव व आयुक्त नागपुरात असतानाही पूर्व आरटीओ कार्यालयाचे कामकाज बंद होते. सूत्रानुसार, कार्यालयाने इंटरनेटचे मासिक बिल भरले नसल्याने संबंधित कंपनीने ही सेवा खंडित केली. जेव्हा कार्यालय प्रशासनाच्या हे लक्षात आले तेव्हा दुपार झाली होती, पैशांची जुळवाजुळव करून सायंकाळी हे बिल भरण्यात आल्याची माहिती आहे. परंतु तोपर्यंत अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले.