नागपूर : नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रवीण कुं टे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ही निवड केली आहे. कुं टे पाटील यांना राष्ट्रवादीच्या शहर व ग्रामीणचे सरचिटणीस, प्रदेश कार्यकारिणीत संघटन सचिव म्हणून कामाचा अनुभव आहे. देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेल्या कुंटे पाटील यांच्यासारख्या एका तळागाळातील सामान्य कार्यक र्त्यांवर अनिल देशमुख यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. अनिल देशमुख शहर अध्यक्ष झाले. परंतु त्यांच्याकडे काही जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी असल्याने मला यात गुंतवू नका, अशी विनंती त्यांनी पक्षनेतृत्वाला केली होती. परंतु त्यानंतरही त्यांचे अध्यक्षपद कायम ठेवण्यात आले. त्यामुळे शहराची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी कुंटे पाटील यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबादारी सोपविली आहे.(प्रतिनिधी)
शहर राकाँच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रवीण कुंटे पाटील
By admin | Updated: September 27, 2015 02:37 IST