शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

संघस्थानी येणारे प्रणव मुखर्जी ठरणार पहिले माजी राष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:58 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. संघातर्फेच याला दुजोरा देण्यात आला असून या कार्यक्रमाच्या पत्रिकादेखील वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ७ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे एकाच मंचावरून उपस्थित राहणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष निश्चितच या वर्गाकडे राहणार आहे. ‘लोकमत’ने सर्वात अगोदर यासंबंधातील वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष.

ठळक मुद्देसंघाचा दुजोरा : राजकीय वर्तुळाचे संघ शिक्षा वर्गाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. संघातर्फेच याला दुजोरा देण्यात आला असून या कार्यक्रमाच्या पत्रिकादेखील वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ७ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे एकाच मंचावरून उपस्थित राहणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष निश्चितच या वर्गाकडे राहणार आहे. ‘लोकमत’ने सर्वात अगोदर यासंबंधातील वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष.तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला नागपुरात १४ मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून ७०८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुखर्जी यांनीदेखील येण्यासाठी होकार कळविला होता. मात्र संघाने याबाबतीत ‘दक्ष’ पवित्रा घेतला होता. पत्रिका येईपर्यंत संघ पदाधिकाऱ्यांनीदेखील मौन साधले होते. मात्र सोमवारी संघाकडून अनेक स्वयंसेवकांना पत्रिका पाठविण्यात आल्या व त्यात प्रणव मुखर्जी यांचे नाव ठळकपणे छापण्यात आले आहे.सन्माननीय व्यक्तींना आमंत्रित करणे ही परंपराचप्रणव मुखर्जी हे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले असले तरी त्यांची राजकीय जडणघडण काँग्रेसच्या मुशीतूनच झाली आहे. संघ परिवार आणि भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर प्रहार करण्यात येत आहे. अशा स्थितीत प्रणव मुखर्जी यांना संघस्थानी का आमंत्रित करण्यात आले हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला विचारणा केली असता सन्माननीय व्यक्तींना संघाच्या कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करणे ही परंपराच असल्याचे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुळात संघाला धर्म, पंथ, पक्ष यांचे बंधन नाही. प्रणव मुखर्जी हे देशाचे राष्ट्रपती होते व त्यांना आदरानेच आमंत्रित करण्यात आले आहे. यात राजकारण असण्याचा काहीच प्रश्न नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय