शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद येवले नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:22 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे माजी प्रमुख डॉ. नरेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून डॉ. प्रमोद येवले हे प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र असल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : आवश्यक निकष पूर्ण करीत नसल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे माजी प्रमुख डॉ. नरेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून डॉ. प्रमोद येवले हे प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र असल्याचा दावा केला आहे.उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालकांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये डॉ. येवले यांच्याकडे विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या निकषानुसार आवश्यक पात्रता नसल्याचे नमूद करण्यात आले होते. कुलपतींनी त्याची दखल घेऊन विद्यापीठाकडून येवले यांच्या पात्रतेसंदर्भात अहवाल मागवायला हवा होता. परंतु, तसे करण्यात आले नाही. त्यामुळे २८ आॅगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम ९(३)(बी) अंतर्गत कुलपतींकडे आवश्यक कागदपत्रांसह याचिका दाखल केली. कुलपतींनी त्यावरही काहीच कार्यवाही केली नाही. येवले हे विद्यापीठातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. परिणामी, या मुद्यावर तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. कुलपतींना त्यांच्याकडे प्रलंबित याचिकेवर निर्णय घेण्यासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्यात यावा किंवा ही याचिका मंजूर करून येवले यांना प्र-कुलगुरू पदासाठी अपात्र घोषित करण्यात यावे, येवले यांची प्र-कुलगुरू पदावरील नियुक्ती रद्द करण्यात यावी आणि या कार्यकाळात त्यांना अदा करण्यात आलेले वेतन व अन्य फायदे वसूल करण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.कुलपती, कुलसचिव यांना नोटीसन्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर विद्यापीठाचे कुलपती, कुलसचिव व डॉ. प्रमोद येवले यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ