शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्धार’मधून भविष्याच्या ‘व्हिजन’वर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:25 IST

भविष्यात नेमके कुठल्या दिशेने मार्गक्रमण करावे, यासंदर्भात विद्यार्थीदशेत मार्गदर्शन मिळाले तर यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी आणखी उत्साह निर्माण होतो.

ठळक मुद्देविज्ञान संस्थेचा उपक्रम : विविध तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भविष्यात नेमके कुठल्या दिशेने मार्गक्रमण करावे, यासंदर्भात विद्यार्थीदशेत मार्गदर्शन मिळाले तर यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी आणखी उत्साह निर्माण होतो. नागपुरातील शासकीय विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांना याची अनुभूती आली. विज्ञान संस्थेत ‘निर्धार : ध्यास ध्येयप्राप्तीचा’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्याची तयारी यावर आधारित ही कार्यशाळा होती.ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर तसेच संस्थेचे संचालक डॉ.रामदास आत्राम यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी डॉ. रिता अग्रवाल, डॉ. संजय रघटाटे, डॉ. सुरेंद्र गोळे तसेच डॉ. सुमंत टेकाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मनोबल खचू न देता आत्मविश्वास वाढविण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन डॉ.अग्रवाल यांनी केले. योग्यता, वृत्ती व संधी यांचा योग्य उपयोग करुन कुठलेही ध्येय प्राप्त करता येते, असे मत डॉ.गोळे यांनी व्यक्त केले. स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रभावशाली कसे होईल, यासाठी विद्यार्थीदशेपासूनच प्रयत्न करा, असा संदेश डॉ.रघटाटे यांनी दिला. शिवाजी महाराजांवर भाष्य करणारे डॉ.सुमंत टेकाडे यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा दिली.कार्यशाळेचा दुसरा दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय मौलिक ठरला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक सचिन बुरघाटे यांनी इंग्रजी भाषेसंदर्भात अतिशय महत्त्वाच्या ‘टीप्स’ दिल्या. आयुष्यात आशेला महत्त्वाचे स्थान असते. ‘होप’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय समर्पक शब्दांत मार्गदर्शन केले. शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्थेचे सहप्राचार्य सुभाशिष चंद्रा यांनी विज्ञान शाखेतील करिअर संधींवर प्रकाश टाकला. स्वायमा अहमद यांनी ‘सॉफ्ट स्किल्स’ आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले. धीरज सिंह, कार्तिक पाठक, श्रेयस रामोजवार, श्रद्धा रायकवार, तृप्ती भोंगाडे, श्रीकांत काटोरे, पलक बहेल, अंजली साहू, राहुल बेंद्रे, अनुज डोये यांचे कार्यशाळा आयोजनात सहकार्य लाभले.