शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांनी नागपुरात अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 15:49 IST

अरविंद बनसोड यांची हत्या २७ मे रोजी नागपूरमध्ये करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली.

ठळक मुद्देन्यायालयीन लढाईत आम्ही सोबत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अरविंद बनसोड हत्याप्रकरणी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शिवाय आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी वकिलांशीही भेटून चर्चा केली.अरविंद बनसोड यांची हत्या २७ मे रोजी नागपूरमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच पोलिसांची भूमिकाही संशयास्पद होती. राज्यभर गाजलेल्या या हत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठविला. राज्यभर निषेध करण्यात आले. सरकारला इशारा देण्यात आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करीत अटकसत्र सुरू करण्यात आले. गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता यावेळी अरविंद बनसोडचे कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या आवारातच अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी काय प्रयत्न करता येतील, ते केले जातील असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले.राज्यात मागासवर्गियांवर हल्ले वाढत असून त्याच्या विरोधात बुधवारी राज्यभर वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हा,तालुका स्तरावर निवेदने देऊन या सरकारचा निषेध करण्यात आला. हे हल्ले थांबले नाही तसेच सर्व प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर