शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी; १९७७ ची पुनरावृत्ती होऊ नये"

By आनंद डेकाटे | Updated: February 7, 2024 16:51 IST

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे विधान

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  निवडणूकीत जागा व मोदींचा पराभव हा नंतरचा भाग आहे. राजकारण होत राहील. परंतु, सत्तेत आल्यास काय करायचे याचा अजेंडा ठरला पाहिजे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या बैठकीच्या प्रारंभापासून आपण किमान समान कार्यक्रमावर भर दिला. त्यासाठी आग्रह धरला. यासाठी वंचीतने शेतकऱ्यांच्या प्रश्नासह एकूण ३१ विषयांचा मसुदा तयार केला. आघाडीतील इतरांनीही तो तयार करावा. पुढील बैठकीत या मसुद्यावर चर्चा होईल. त्यानंतरच्या बैठकीत जागा वाटपावार चर्चा होईल, असे स्पष्ट करीत किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी होईल, असे सूचक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार एड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

बुधवारी ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीसोबत चर्चा वाटपावर सध्या कुठलीही चर्चा झालेली नाही. किंवा आमच्याकडून सुद्धा कुठल्याही जागेची मागणी करण्यात आलेली नाही. चर्चा होत नव्हती म्हणून १२ जागांचा मुद्दा छेडण्यात आला होता, असेही एड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

एड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आघाडीसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम व कॉमन अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. लोकशाही वाचवण्यासाठी १९७७ मध्ये असेच सर्व पक्ष एकत्र आले. सत्ताही आली. त्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला. त्यातून अनेक पक्ष फुटले. त्याची पुनरावृत्ती  होऊ नये. म्हणून आम्ही खबरदारी घेतोय. कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल हे ठरायला हवे. यासाठी आम्ही ३१ विषय आघाडीकडे सादर केले आहेत. त्यावर चर्चा होणार आहे.  यावर चर्चा होऊन निर्णय होईल. त्यानंतरच जागा वाटपावर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर व पूर्व विदर्भ अध्यक्ष माजी मंत्री रमेश गजबे उपस्थित होते.

शरद पवारांचे केवळ चिन्ह गेले लोकं त्यांच्यासोबतच

शरद पवार यांच्या पक्षाचे केवळ चिन्ह गेले, शरद पवार आहे तिथेच आहेत. नागरिकांना सर्व समजते. त्यामुळे लोक (मास) त्यांच्यासोबत आहे, असेही एड. आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर