शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे गुणगान करणे म्हणजे लोकशाही नव्हे : सोली सोराबजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 20:08 IST

केवळ सरकारचे गुणगान करणारी व मानवाधिकारांना पदोपदी ठोकर मारणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये मानवाधिकारांना सर्वोच्च स्थान असायला पाहिजे व मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या सरकारवर सडेतोड टीका झाली पाहिजे असे परखड मत देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी शनिवारी अ‍ॅड. सुदर्शन गोरडे स्मृती व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देमानवाधिकारांना सर्वोच्च स्थान मिळणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ सरकारचे गुणगान करणारी व मानवाधिकारांना पदोपदी ठोकर मारणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये मानवाधिकारांना सर्वोच्च स्थान असायला पाहिजे व मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या सरकारवर सडेतोड टीका झाली पाहिजे असे परखड मत देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी शनिवारी अ‍ॅड. सुदर्शन गोरडे स्मृती व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.हे व्याख्यान हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने हायकोर्टाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. ‘मानवाधिकारांच्या संरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका’ हा व्याख्यानाचा विषय होता. सोराबजी म्हणाले, एखाद्या देशात लोकशाही असल्याचा दावा कुणी करीत असल्यास त्या देशातील वृत्तपत्रे व न्यायालयांच्या निर्णयांचे अध्ययन करावे. त्यामध्ये केवळ सरकारची प्रशंसा केली जात असेल आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली जात नसेल तर, लोकशाहीचा दावा सत्य मानला जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मानवाधिकारांचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुर्दैवाने न्यायालयांवर विविध विषयांवरून टीका करताना ही बाब विचारात घेतली जात नाही.राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये मानवाधिकारांना स्थान देण्यात आले आहे. त्यात स्पष्टपणे नमूद नसलेल्या काही मानवाधिकारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे संरक्षण प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मानवाधिकाराची व्याख्या विस्तारली आहे. जगण्याच्या अधिकाराला व्यापकता मिळवून दिली आहे. जगण्याचा अधिकार आता केवळ शारीरिक अस्तित्वापुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, वस्त्र, निवारा, प्रदूषण रहित वातावरण, स्वच्छता, आरोग्य इत्यादी बाबींची उपलब्धता जगण्याच्या अधिकारांतर्गत आली आहे. एवढे सर्व मिळूनही अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची व्यवस्था नसल्यास जगण्याच्या अधिकाराला काहीच अर्थ उरत नाही असे त्यांनी सांगितले.जनहित याचिकांमध्ये दिल्या जाणाऱ्या आदेशांवर बरेचदा आक्षेप घेतले जातात. न्यायालय सरकारच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करीत असल्याचे बोलले जाते. परंतु, मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्यास न्यायालय हातावर हात ठेवून पहात राहू शकत नाही. काळाच्या ओघात जनहित याचिकांचा दुरुपयोग होत असला तरी, न्यायालय त्यावर वेळोवेळी आवश्यक उपाय करीत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.व्यासपीठावर ज्येष्ठ अधिवक्ता ए. एम. गोरडे, संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमण व सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर उपस्थित होते. अ‍ॅड. प्रीती राणे यांनी संचालन केले. 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल