शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रफुल्ल पटेल यांच्या काँग्रेसला कानपिचक्या, म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 11:30 IST

महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे आहोत. लोकसभेतही आमची संख्या काँग्रेसपेक्षा जास्त आहे. तरी आम्ही काँग्रेसला मोठ्या भावाप्रमाणे वागवतो. आता काँग्रेसनेही मोठेपणा दाखवावा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या.

नागपूर : महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे आहोत. लोकसभेतही आमची संख्या काँग्रेसपेक्षा जास्त आहे. तरी आम्ही काँग्रेसला मोठ्या भावाप्रमाणे वागवतो. आता काँग्रेसनेही मोठेपणा दाखवावा. महाविकास आघाडीची सत्ता ही शरद पवार यांच्यामुळे आली हे विसरता कामा नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या.

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकी तयारी जोरात सुरू केली असून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कमान हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काल शनिवारी शिवसेनेमधील काही कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. सावरबांधे यांनी त्यानंतर आपली कामाची गती वाढवत त्यांचे शिवसेनेतील समर्थक असलेले कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवक यांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळविले. 

अक्षय मंगल कार्यालय, नंदनवन येथे शनिवारी आयोजित मेळाव्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री जांभुळे, महिला उपजिल्हा संघटिका नीलम उमाठे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत ठाकरे, शहर समन्वयक तुषार कोल्हे आदींनी प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना पटेल म्हणाले, राज्यात परत भाजपची सत्ता आली तर आमचे काही खरे नाही, असे म्हणत काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीकडे आले. शेवटी शरद पवार यांनी पुढाकार घेत सत्ता स्थापन केली. नागपुरात आजवर आम्ही विधानसभा लढवली नाही, त्यामुळे थोडं मागे राहिलो. येत्या काळात विधानसभा लढवू, असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला.

यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, ईश्वर बाळबुधे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत पवार, अनिल अहिरकर, बजरंग सिंह परिहार, नगरसेविका आभा पांडे, वेदप्रकाश आर्य, अशोक काटले आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस