शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजना :नागपूर जिल्ह्यातील ६ तालुक्यात १८६६ घरकुले मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:00 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) क्षेत्रातील ९ तालुक्यापैकी मौदा, कामठी, नागपूर (ग्रामिण), उमरेड, कुही व हिंगणा या ६ तालुक्यात १८६६ घरकुले केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत. हि घरे ३० चौ.मी. म्हणजे सुमारे ३३० चौ. फुट या आकाराचे असतील व लाभार्थ्यांना स्वत: च ही घरे बांधावयाची आहेत. यासाठी लाभार्थ्यांना ३ टप्प्यात एकूण २ लाख ५० हजार एवढे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना तीन टप्प्यात मिळणार अडीच लाखांचे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) क्षेत्रातील ९ तालुक्यापैकी मौदा, कामठी, नागपूर (ग्रामिण), उमरेड, कुही व हिंगणा या ६ तालुक्यात १८६६ घरकुले केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहेत. हि घरे ३० चौ.मी. म्हणजे सुमारे ३३० चौ. फुट या आकाराचे असतील व लाभार्थ्यांना स्वत: च ही घरे बांधावयाची आहेत. यासाठी लाभार्थ्यांना ३ टप्प्यात एकूण २ लाख ५० हजार एवढे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.एनएमआरडीए क्षेत्रात या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावित घरकुलांच्या जागेचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामा तयार करावयाचे काम प्रगतिपथावर आहे. मंजूर १८६६ घरकुलांपैकी पैकी सुमारे ४०० घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.प्रधानमंत्री आवास योजना घटक चार अंतर्गत लाभार्थ्यांना आपल्या घराचे बांधकाम स्वत: करावयाचे आहे. यासाठी बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ५२ नुसार संभंधित ग्रामपंचायतीस आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांने ग्रामपंचायत हद्दीतील (गावठाण ) जागेवर घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांनी रीतसर संंबंंधित ग्रामपंचायतीची परवानगी प्राप्त करून घ्यावी. याबाबत एनएमआरडीएने जिल्हा परिषद व सर्व संबंधित गट विकास अधिकारी यांना तशी विनंती केली आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाnagpurनागपूर