शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप पोहाणे यांनी मनपा स्थायी समिती अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 20:34 IST

भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहाणे यांनी मावळते अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडून मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षांच्या कक्षात पदग्रहणप्रसंगी महापौर नंदा जिचकार आणि वीरेंद्र कुकरेजा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोहाणे यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

ठळक मुद्देबिनविरोध निवड : सर्वांना न्याय देण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहाणे यांनी मावळते अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्याकडून मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षांच्या कक्षात पदग्रहणप्रसंगी महापौर नंदा जिचकार आणि वीरेंद्र कुकरेजा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोहाणे यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.तत्पूर्वी स्थायी समितीच्या विशेष सभेत प्रदीप पोहाणे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्ज न आल्याने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी पोहाणे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. सत्तापक्षाने पोहाणे यांच्या नावाची घोषणा आधीच केली होती.सर्वांची साथ, सर्वांना न्यायस्थायी समिती अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. समितीच्या माध्यमातून शहराचा विकास करताना सर्वांना सोबत घेऊ न व सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही प्रदीप पोहाणे यांनी दिली. अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्यानंतर मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित पदग्रहण समारंभात ते बोलत होते.अध्यक्ष म्हणून आता संपूर्ण शहराची जबाबदारी आपल्यावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, शहरातील सर्व आमदार, महापौर आणि मनपातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात ही जबाबदारीही आपण यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास पोहाणे यांनी व्यक्त केला.अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी मंचावर आ. सुधाकर देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष व आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ.प्रा. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्यासह समितीचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, तानाजी वनवे व वीरेंद्र कुकरेजा आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तर आभार प्रतोद दिव्या धुरडे यांनी मानले.कार्यकर्ता ते अध्यक्षनवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे मंत्री, उपाध्यक्ष आणि महामंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. २०१२ ते २०१७ दरम्यान ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. लकडगंज झोनचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मधून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. २०१२ च्या निवडणुकीत वयाच्या २४ व्या वर्षी प्रभाग ३४ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक