शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

नागपूर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 15:03 IST

नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मधील भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभाजपच्या १२ सदस्यांची नावे जाहीर काँग्रेसच्या कोट्यातून दोघांची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मधील भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १ मार्चला विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांचा कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी पोहाणे अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारतील.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार दरवर्षी ५० टक्के सदस्य निवृत्त होतात. सभागृहातील संख्याबळानुसार १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपच्या कोट्यातून १२ सदस्य आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी भाजपच्या सहा व काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर माजी महापौर प्रवीण दटके यांनी भाजपच्या कोट्यातील सर्व १२ सदस्य नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा केली. यात प्रदीप पोहाणे, वैशाली रोहणकर, श्रद्धा पाठक, यशश्री नंदनवार, जगदीश ग्वालबंशी, वर्षा ठाकरे, स्नेहा बिहारी, वंदना भगत, निरंजना पाटील, संजय चावरे, लखन येरवार व विजय चुटले यांचा समावेश आहे. काँग्रेसचे दिनेश यादव व गार्गी चोपरा यांचा समावेश आहे. बसपाच्या कोट्यातील एका सदस्यांची घोषणा पुढील बैठकीत के ली जाणार आहे.प्रारंभी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून महापौर नंदा जिचकार यांनी नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. स्थगित सभा २६ फेब्रुवारीला होणार आहे.अन् ढोल-ताशांचा गजर बंद केलास्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे निवड होणार असल्याने सभागृहाबाहेर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. सभागृहात स्थायी समितीवर वर्णी लागताच त्यांच्या समर्थकांनी सभागृहाबाहेर ढोल-ताशे वाजवायला सुरुवात केली. परंतु शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज स्थगित केले असताना जल्लोष करणे उचित नसल्याने माजी महापौर प्रवीण दटके व स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी ढोल-ताशांचा गजर बंद करण्यास सांगितले. त्यानंतर लगेच जल्लोष थांबला. व कार्यकर्ते पोहाणे यांना हारतुरे न घेता निघून गेले.आरती ओवाळणाऱ्या चावरेंचीही वर्णीप्रभाग ५ (ड)मधील भाजपाचे नगरसेवक संजय अरूणराव चावरे प्रभागात दिसत नाही. विकास कामे करीत नसल्याने संतप्त महिलांनी पालकमंत्र्यांच्या लकडगंज झोन येथील जनसंवाद कार्यक्रमात चावरे यांची आरती करण्यासाठी ताटात साहित्य आणले होते. मात्र पोलीस बंदोबस्तामुळे महिलांना आरती करता आली नव्हती. असे असूनही चावरे यांची स्थायी समितीवर वर्णी लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका