लाेकमत न्यूज नेटवर्क
जालालखेडा : राज्यातील महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या कंपन्यांतर्गत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी व कामगारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन प्रणीत तांत्रिक अप्रेन्टिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या कामबंद आंदाेलनात नरखेड तालुक्यातील बहुतांश वीज कर्मचारी व कामगार सहभागी झाल्याने तालुक्यातील विजेची कामे प्रभावित झाली हाेती. साेमवारी (दि. २४) करण्यात आलेल्या या आंदाेलनात कामगारांनी काळा फिती लावून शासनाच्या धाेरणांचा निषेध नाेंदविला.
राज्य शासनाने वीज उत्पादन व वितरण क्षेत्रातील तिन्ही कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अभियंते, कर्मचारी, तंत्रज्ञ, नियमित व कंत्राटी कामगारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, त्यांचे तातडीने काेराेना प्रतिबंधक लसीकरण करावे, त्यांना ५० लाख रुपयांच्या विमा याेजनेचा लाभ द्यावा, सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी, याबाबत विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन व तांत्रिक अप्रेन्टिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली हाेती. त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्याने कामबंद आंदाेलन केले जात असल्याची माहिती असाेसिएशनचे राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी दिली.
आंदाेलन हाॅस्पिटलमधील रुग्ण व वीजग्राहकांना त्रास हाेणार नाही तसेच अत्यावश्यक सेवा प्रभावित हाेणार नाही, यावी काळजी घेतली जात असल्याची माहिती असाेसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत नन्नाेरे व जिल्हा अध्यक्ष विक्की कावळे यांनी दिली. या आंदाेलनात नरखेड तालुक्यातील कुणाल जिचकार, सुधाकर काकडे, विजय रेवतकर, नीलेश चक्रपाणी, रवी सरोदे, शुभम भोयर यांच्यासह अन्य कर्मचारी व कामगार सहभागी झाले हाेते.
===Photopath===
240521\img_20210524_160038.jpg
===Caption===
फोटो ओळी. काळया फित लाऊन काम बंद आंदोलन करताना कर्मचारी व कामगार.