शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

पावसामुळे अनेक भागातील बत्ती गुल; ट्रान्सफॉर्मर खराब, विजेच्या तारावर फांद्या पडल्या

By आनंद डेकाटे | Updated: April 2, 2025 20:53 IST

महावितरणचे मोठे नुकसान रात्री उशिरा शहराला अवकाळी पावसाने झोडपले.

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहराची वीज वितरण व्यवस्था कोलमडली. अनेक भाग अंधारात बुडाले होते. बुधवारी सकाळी काही ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला.

रात्री उशिरा शहराला अवकाळी पावसाने झोडपले. याचा वीज वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अनेक ट्रान्सफॉर्मर खराब झाले. झाडांच्या फांद्या तुटून विद्युत खांब व तारांवर पडल्या. वाडी परिसरातील खांबावर लागलेली डिस्ट खराब झाली. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. खांब वाकडे झाले. मोठ्या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणला पुरवठा बंद करणे भाग पडले. पाऊस ओसरल्यानंतर महावितरणचे कर्मचारी कामाला लागले. रात्री उशिरापर्यंत बहुतांश भागात पुरवठा सुरळीत झाला. मात्र बेसा, रामटेके नगर, म्हाळगी नगर येथील अनेक भागात बुधवारी सकाळपर्यंत वीज नव्हती. दरम्यान, महावितरणकडून नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे.

प्रभावित परिसरमहावितरणच्या महाल विभागाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. वाडी, दत्तवाडी आदी भागांनाही मोठा फटका बसला. पार्वती नगर, रामेश्वरी, अभय नगर, बेसा, मानेवाडा, रामबाग, महाल, सक्करदरा, नवीन सुभेदार, जानकी नगर, भगवान नगर, उमरेड रोड, सूतगिरणी. वाठोडा, बगडगंज, श्रीकृष्ण नगर, वाडी, त्रिमूर्ती नगर, छत्रपती नगर, सोमलवाडा, मनीष नगर या भागातील वीज पुरवठा अनेक तास ठप्प होता.मेडिकल परिसरातील केबलमध्ये आगमेडिकल कॉलेजच्या भिंतीजवळ येणाऱ्या केबलला जास्त भार आल्याने आग लागली. त्यामुळे वंजारी नगर व मेडिकलच्या आसपासच्या इतर भागात बुधवारी दुपारी अनेक तास वीज नव्हती. याशिवाय महाल विभागात वीज पुरवठा खंडित झाल्याच्या १०० हून अधिक वैयक्तिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊस