शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

पदभरती अनिश्चित काळासाठी ‘पोस्टपोन’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:47 IST

एकाच श्रेणीच्या पदभरतीला वेगवेगळे नियमलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पदभरती आणि वाद हे समीकरणच झाले आहे. फारसा कुणाला थांगपत्ता लागू न देता विद्यापीठाने तीन पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे वेळापत्रक निश्चित केले. मात्र अधीक्षकाच्या पदांसाठी लेखी परीक्षेची घोषणा प्रशासनाने केली असता आरक्षित गटातील पदाची भरती करताना उमेदवारांना थेट ...

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ भरती प्रक्रिया परत वादाच्या भोवºयात :

एकाच श्रेणीच्या पदभरतीला वेगवेगळे नियमलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पदभरती आणि वाद हे समीकरणच झाले आहे. फारसा कुणाला थांगपत्ता लागू न देता विद्यापीठाने तीन पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे वेळापत्रक निश्चित केले. मात्र अधीक्षकाच्या पदांसाठी लेखी परीक्षेची घोषणा प्रशासनाने केली असता आरक्षित गटातील पदाची भरती करताना उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे शासनाच्या निर्णयाबाबत अनभिज्ञ असणाºया विद्यापीठाने वेळापत्रक ठरविले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पदभरती अनिश्चित काळासाठी ‘पोस्टपोन’ होण्याची शक्यता आहे.४ वर्षांअगोदर विद्यापीठाने ४७ विविध पदांसाठी पदभरती प्रक्रियेची जाहिरात दिली होती. परंतु ही प्रक्रिया फायलींच्या बाहेर सरकलीच नाही. दरम्यान, विद्यापीठांत सत्रप्रणाली लागू झाल्यामुळे कर्मचाºयांवरील कामाचा ताण वाढला आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्तदेखील झाले. या पार्श्वभूमीवर कमीत कमी ५० टक्के रिक्त पदांवर भरती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या निर्देशांवर बोट ठेवत केवळ २३ शिक्षकेतर पदांची भरती करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला व जाहिरात काढण्यात आली.तृतीय श्रेणीच्या पदांसाठी जास्त अर्ज आले असल्याने उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. पदभरतीसंदर्भात विद्यापीठाकडून वेळापत्रक कधी जारी करण्यात येईल, याबाबत उमेदवारांना प्रतीक्षा होती. अचानक २५ आॅक्टोबरपासून केवळ ३ पदांची भरतीसाठी मुलाखती होतील, अशी माहिती काही उमेदवारांना मिळाली. यात विधी अधिकारी, सहायक कुलसचिव व अधीक्षक (आरक्षित गट) यांचा समावेश आहे. जाहिरात २३ पदांसाठी देण्यात आली असताना केवळ ३ च पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक ठरविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातही अधीक्षकाच्या दोन पदांसाठी जाहिरात असताना केवळ एकाच पदाचे वेळापत्रक का लावण्यात आले आणि लेखी परीक्षेऐवजी थेट मुलाखतीसाठीच का बोलविण्यात आले, असे प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहेत.दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने विद्यापीठांनी सद्यस्थितीत सर्व प्रकारच्या पदांच्या भरतीला थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.याबाबत विद्यापीठातील अधिकारी अनभिज्ञच होते. अगोदरच उपस्थित होत असलेले प्रश्न व शासकीय पातळीवरील सूचना, यामुळे नियोजित मुलाखती अनिश्चित काळासाठी ‘पोस्टपोन’ होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ही कसली पारदर्शकता ?विद्यापीठाच्या संकेतस्थळावर २० एप्रिल २०१७ रोजी जाहिरात जारी करण्यात आली. त्यानंतर छाननी प्रक्रियेत किती अर्ज वैध ठरले याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली. त्यानंतर आता तीन पदांसाठी तयार करण्यात आलेले वेळापत्रक ना विद्यापीठाच्या सूचना फलकावर लावण्यात आले ना संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्यात आले. त्यामुळे पदभरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरदेखील प्रश्न उपस्थित होत आहेत.निवडणूक काळातील पदभरतीवर आक्षेपविद्यापीठात सद्यस्थितीत प्राधिकरण निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशा स्थितीत केवळ निवडक पदांसाठी मुलाखती घेण्यावरून वातावरण तापले आहे. विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे कुलगुरूंची भेट घेण्यात आली व निवडणूक काळात पदभरतीची इतकी घाई का करण्यात येत आहे, असा प्रश्न करण्यात आला. सद्यस्थितीत तातडीने भरती व्हावी, अशी विद्यापीठात आकस्मिक परिस्थिती आलेली नाही. निवडणूक काळात पदभरती होणे, ही बाबच खटकणारी आहे. या निवडणुकांना आचारसंहिता लागू नसली तरी नैतिकता पाळणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही यावर आक्षेप घेतला असल्याची माहिती शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी दिली.