शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती; मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी. यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 20:34 IST

Nagpur News कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव लक्षात घेता, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पुन्हा १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी जारी केले.

 

नागपूर : कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव लक्षात घेता, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पुन्हा १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी जारी केले.

कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश १५ डिसेंबरनंतर जारी करण्यात येतील. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मात्र मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन या वर्गातील शाळा सुरू करण्याला स्थगिती दिली आहे. आयुक्तांनी हा निर्णय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार घेतला आहे. शिक्षण विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र या वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहील.

यासंदर्भात निर्गमित केलेले आदेश, मार्गदर्शक सूचना व त्यानुसार लागू असणारे प्रतिबंधात्मक आदेश व उपाययोजना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड - १९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंडसंहितेचे कलम १८८ नुसार, अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील.

कोविड नियमांचे पालन करा

सध्या कोरोना विषाणूचा नवा प्रकार "ओमायक्रॉन" आढळून आला असून जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणू प्रकारास व्हेरियंट आफ कंर्सन म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व कोविड नियमांचे पालन करावे आणि घराबाहेर पडताना मास्क, सतत सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून व्यवहार करावेत, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन् बी यांनी केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा