शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पोस्टमन गरजूंना पोहचविणार रक्कम :मदतीसाठी डाक विभागाची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:20 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात बंदिस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी डाक विभाग समोर आला आहे. यापुढे पोस्टमन या गरजवंतांना ५००० रुपयापर्यंतची रक्कम घरी पोहचवतील.

ठळक मुद्देकोणत्याही बँकेचे ज्येष्ठ नागरिक खातेधारक घेऊ शकतील फायदा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात बंदिस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी डाक विभाग समोर आला आहे. यापुढे पोस्टमन या गरजवंतांना ५००० रुपयापर्यंतची रक्कम घरी पोहचवतील. डाक विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक यांनी गुरुवारी याबाबत आदेश दिले.सध्याच्या परिस्थितीत नागपूर शहर क्षेत्राचे २८ डाकघरांचे काम सुरू आहे. निर्धारित अंतर लक्षात घेत नागरिक या डाकघरांच्या सेवेचा लाभ घेऊ शकतात. मात्र अनेक असे नागरिक आहेत जे कार्यालयापर्यंत पोहचण्यास असक्षम आहेत किंवा त्यांना इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा गरजू व्यक्तींसाठी टपाल विभागाने व्यवस्था केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे टपाल विभागाचे खातेधारक असण्याची आवश्यकता नाही. हे गरजू नागरिक कोणत्याही बँकेचे खातेधारक असले तरी डाक विभाग त्यांना नि:शुल्क सेवा देणार आहे. यासाठी नागपुरात राहणाऱ्या व्यक्तीने इतवारी येथील मुख्य डाकघराच्या कॉल सेंटरवर दूरध्वनी क्रमांक ०७१२-२७६५४२० यावर आणि पश्चिम नागपूर क्षेत्रात राहणारे नागरिक जीपीओमध्ये ०७१२-२५६०१७० या क्रमांकावर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत संपर्क करू शकतील.अशी मिळेल सुविधाकोणत्याही बँकेचे खातेधारक ज्येष्ठ नागरिक वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यानंतर टपाल कर्मचारी जवळच्या डाकघराशी संपर्क करून दिलेल्या पत्त्याबाबत माहिती घेतील. या माहितीला ते संबंधित पोस्ट ऑफिसपर्यंत पोहचवतील. त्या डाकघरात सेवा देणाऱ्या पोस्टमनला संबंधित पत्त्यावर पाठविण्यात येईल. पोस्टमन दिलेल्या पत्त्यावर पोहचून खातेधारकाचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड तपासून त्याला मदत करतील. यानंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी क्रमांक आल्यानंतर पोस्टमन ग्राहकांना त्यांनी मागविलेली रक्कम सोपवतील. यासाठी खातेधारकाचा मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. बी.व्ही. रमण, वरिष्ठ प्रवर अधीक्षक, डाक विभाग

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसbankबँक