शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

पोस्टल दिन सप्ताह विशेष; अद्याप पोस्टमनची सायकल सुटली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:39 IST

सर्वच क्षेत्रात तंंत्रज्ञानाचे घोडे सुसाट पळत असताना हा पोस्टमन मात्र आजही त्याच्या सायकलने दारोदार भटकताना दिसतो. कामाचा व्याप वाढला आहे, पण पत्राच्या आतुरतेमुळे पूर्वी मिळणारा आपुलकीचा आदर मात्र हरवला आहे.

ठळक मुद्देसुविधा नाही, पेट्रोलचा भत्ताही नाही अल्प मनुष्यबळातच करावे लागते काम

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडियामुळे पत्राची संकल्पना आता मागे पडली आहे. ख्यालीखुशालीची पत्रे दिसत नसली तरी पोस्टमन मात्र आजही आपल्या सेवेत आहे. काळ बदलला तसे काम बदलले, पण अवस्था मात्र तशीच आहे. सर्वच क्षेत्रात तंंत्रज्ञानाचे घोडे सुसाट पळत असताना हा पोस्टमन मात्र आजही त्याच्या सायकलने दारोदार भटकताना दिसतो. कामाचा व्याप वाढला आहे, पण पत्राच्या आतुरतेमुळे पूर्वी मिळणारा आपुलकीचा आदर मात्र हरवला आहे.आधुनिक काळाच्या गरजेनुसार सर्वच क्षेत्रात मोठा बदल घडून येत असताना टपाल विभागातही बदल घडणे साहजिकच होते. दीडशे वर्षे पत्राद्वारे जनतेची सेवा करणाऱ्या या विभागाचाही व्याप आता वाढला आहे. विमा योजना आणि बचत खात्याने सुरू झालेला हा बदल पुढे स्पीड पोस्ट, पोस्ट बँक, आधार केंद्र आणि पासपोर्ट सेवा केंद्राच्या कामांचीही यात भर पडली आहे. नागरिकांची पत्रे पाठविण्याची सवय कमी झाली असली, तरी कॉपोर्रेट व सरकारी कामांसाठी रजिस्टर्ड पत्रे पाठविणे बंधनकारक असल्याने काम वाढले आहे. यासह नवीन सेवांचीही जबाबदारी पोस्टमनला सांभाळावी लागते आहे. हा सगळा व्याप वाढला असताना बदलत्या काळानुसार लागणाऱ्या सुविधा मिळण्याचे भाग्य मात्र पोस्टमनला लाभले नाही, असे दिसते. अनेक पोस्टमननी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्या व्यथा मांडल्या. हा पोस्टमन आजही त्याच्या सायकलने दारोदार फिरतो. विभागातर्फे त्यांना पेट्रोलचा भत्ताही मिळत नसल्याने त्यांना सायकलने फिरण्याशिवाय पर्याय नाही. पोस्टाच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातर्फे २०१७ ला पार्सल डिलिव्हरी सेंटर सुरू करण्यात आले व हे पार्सल वितरण करणाºयांना पेट्रोलचा भत्ता मिळतो, मात्र इतर कामांसाठी त्यांना अशी कुठलीही सुविधा मिळत नाही. दुसरीकडे अल्प मनुष्यबळामुळेही कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पत्रव्यवहार कमी झाले असले तरी इतर कामांचा व्याप वाढला आहे. या आवश्यकतेनुसार भरती मात्र होत नाही. एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे ५० जागांची भरती करायला वर्ष-दोन वर्ष लागतात. ही भरती होईपर्यंत नवीन बॅकलॉग तयार होतो. अनेक वर्षांपासून टपाल खात्यात मोठी भरती करण्यात आली नाही. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर पडतो. पोस्टमनबाबतही हीच अवस्था आहे.

२२५ पोस्टमनवर शहराचा भारकेवळ नागपूर शहराचा विचार केल्यास निर्धारीत संख्येनुसार ३३० पोस्टमनची गरज असताना केवळ २०० ते २२५ पोस्टमन कार्यरत आहेत. ही गरजही १० वर्षापूर्वी नोंदविण्यात आली होती. शहराचा प्रचंड वाढलेला व्याप बघता, या कर्मचाऱ्यांना किती अडचणी येत असतील हा विचार केलेलाच बरा. एका पोस्टमनने दिलेल्या माहितीनुसार दररोज पाठीवर २० ते ३० किलोचे वजन घेऊन पत्र, रजिस्टर, लेटरहेड, स्पीड पोस्ट वाटत फिरत असतो. २२ ते २५ इमारतींमध्ये चढ-उतर करावी लागत आहे. या इमारतींना लिफ्टची सुविधा नसल्यास अनेक मजले चढून पत्ता शोधावा लागतो. त्यामुळे तंत्रज्ञानानुसार पोस्टाच्या व्यवहारात बदल करण्यात आले असले तरी मनुष्यबळ आणि सुविधांच्या बाबतीच अजूनही १९ व्या शतकानुसारच काम होते की काय, अशी शंका उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस