शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तालुका पातळीवर स्वीकारावे पोस्टल बॅलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:38 IST

नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘पोस्टल बॅलेट’च्या माध्यमातून मतदान केले आहे. मात्र अनेक कर्मचारी यापासून वंचित राहिले होते. सातत्याने तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने मतगणनेपर्यंत ‘पोस्टल बॅलेट’ स्वीकारले जातील, असे स्पष्ट केले आहे. मात्र हे जमा कुठे करायचे, याबाबत कर्मचारी व शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. तालुका पातळीवरच ‘बॅलेट’ स्वीकारण्यात यावे, असा सूर उमटू लागला आहे.

ठळक मुद्देकर्मचारी व शिक्षकांची मागणी : जमा कुठे करायचे, याबाबत माहितीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘पोस्टल बॅलेट’च्या माध्यमातून मतदान केले आहे. मात्र अनेक कर्मचारी यापासून वंचित राहिले होते. सातत्याने तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने मतगणनेपर्यंत ‘पोस्टल बॅलेट’ स्वीकारले जातील, असे स्पष्ट केले आहे. मात्र हे जमा कुठे करायचे, याबाबत कर्मचारी व शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. तालुका पातळीवरच ‘बॅलेट’ स्वीकारण्यात यावे, असा सूर उमटू लागला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी सरकारी कर्मचारी व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. ‘पोस्टल बॅलेट’साठी त्यांचे अर्जच स्वीकारण्यात येत नसल्याचा या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांनी आरोप केला होता. ‘पोस्टल बॅलेट’ अर्जाच्या संबंधित विधानसभा क्षेत्रातच जमा करावा, असे अधिकारी सांगत आले. यादरम्यान ११ एप्रिल रोजी मतदानदेखील झाले. मात्र ज्यांची निवडणुकीत ‘ड्युटी’ लागली होती ते मताधिकाराबद्दल चिंतित आहेत. निवडणुकीच्या कामावरून परत आल्यानंतर आता ‘पोस्टल बॅलेट’ जमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जमा कुठे करायचे, हीच माहिती त्यांच्याकडे नाही.सुविधा देण्याची मागणीमतदारांना त्यांच्या घराजवळील बूथवरच मतदानाची संधी मिळावी, असा भारतीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो. मतदारांप्रमाणेच ‘पोस्टल बॅलेट’चा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचादेखील विचार झाला पाहिजे. बऱ्याच अंतरावरून आपल्या विधानसभा क्षेत्रात येऊन ‘पोस्टल बॅलेट’ जमा करणे अडचणीचे होते. त्यामुळेच तालुकास्तरावरच ही व्यवस्था झाली पाहिजे, अशी मागणी समोर येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019