शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

लोकसभेत त्रिशंकू निकालांचीच शक्यता : यशवंत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:36 IST

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जागा वाढणार, पण सर्वात मोठा पक्ष राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.येत्या निवडणुका या खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. २०१४ नंतर सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत होती. मात्र पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पक्षात नवचैतन्य संचारले. लोकसभा निवडणुकांत २०१४ च्या तुलनेत निश्चितच काँग्रेसच्या जागा वाढतील. मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येऊ शकणार नाही. दुसरीकडे विधानसभांमध्ये भाजपाला अपयश आले असले तरी, लोकसभेचे गणित वेगळे असल्यामुळे त्या निकालांचा फारसा फटका भाजपाला तेथे बसणार नाही. संपूर्ण बहुमताच्या आकडेवारीपासून भाजपा दूरच असेल. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील जागा निश्चितच कमी होतील. परंतु ओडिशा, पश्चिम बंगाल यांच्यासह ईशान्येकडील राज्यांत भाजपाच्या जागा वाढतील. त्यामुळे साधारणत: भाजपा दोनशेच्या आसपास जागा जिंकू शकेल. बहुमतासाठी रालोआला जागा कमी पडल्या तर तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील, असे यशवंत देशमुख म्हणाले.उत्तर प्रदेशच ठरणार ‘किंगमेकर’, राज्यात युतीचा फायदालोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेश राज्यच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावा यशवंत देशमुख यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये मागील निवडणुकांत ८० पैकी ७१ जागांवर भाजपाने विजय मिळविला होता. मात्र सपा-बसपा यांनी हातमिळावणी केल्यामुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे, बसपासाठी सपाचे जुनेजाणते कार्यकर्ते कितपत काम करतील हा देखील एक मुद्दा आहे, असे यशवंत देशमुख म्हणाले. राज्यात भाजपा-सेना वेगवेगळे लढले असले तर नुकसान झाले असते. युतीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा दावादेखील त्यांनी केला.निवडणूक प्रचाराचा मुद्दा काय असणार ?काँग्रेसकडून राफेल, नोटाबंदी, जीएसटी यांच्यावर मागील काही काळापासून सातत्याने आवाज उचलण्यात येत आहे. तर भाजपाने विकासकार्ड खेळण्याची तयारी दाखविली आहे. पाच वर्ष भाजपाने मध्यमवर्गाकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून या वर्गाच्या अपेक्षांवर भर दिला. परंतु निवडणुका घोषित व्हायला काही दिवसांचा अवधी असला तरी निवडणुकांच्या प्रचाराचा मुद्दा नेमका काय असेल याची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यातच पुलवामा येथील हल्ल्यानंतर जनतेमध्ये आक्रोश आहे. यावर भारताकडून कारवाई कशी होते, यावरदेखील निवडणुकांचे चित्र अवलंबून राहू शकते, असेदेखील यशवंत देशमुख म्हणाले.प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला निश्चितच फायदाप्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा दिल्याचा पक्षाला निश्चितच फायदा पोहोचणार आहे. प्रियंका गांधी यांची कार्यप्रणाली, बोलण्याची शैली व आत्मविश्वास नक्कीच आश्वासक आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील मतदारांवर त्यांचा प्रभाव पडेल. मात्र नवमतदारांकडून कौल मिळेल का याबाबत शंका असल्याचे यशवंत देशमुख म्हणाले.

 

टॅग्स :ParliamentसंसदElectionनिवडणूक