शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांना सहा महिन्याच्या आत पट्टेवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 10:21 IST

पुढील सहा महिन्याच्या आत झोपडपट्टीवासीयांना पट्टे मिळतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देउत्तर नागपुरातील सभेत नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टीवासीयांना पट्टे देण्याची अनेक काळापासूनची मागणी होती. आम्ही आश्वासन दिले होते. त्यानुसार शहरातील झोपडपट्टीवासीयांना पट्टेवाटप केले व त्यांना घरमालक केले. उर्वरित लोकांना पुढील सहा महिन्याच्या आत पट्टे मिळतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले.उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील कळमना येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. उत्तर नागपुरात गडकरी यांच्या तीन सभा झाल्या. या सर्वच सभांना चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी मंचावर खासदार डॉ विकास महात्मे, आ. डॉ मिलिंद माने, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विकी कुकरेजा, बरिएमंच्या नेत्या अ‍ॅड.सुलेखा कुंभारे, रमेश फुले, प्रभाकर येवले, बंडू तळवेकर, परिणीती शेख, मनिषाताई पाटील, सुनिताताई नेवारे, शेषराव गोतमारे, भोजराज डूंबे, राजू बहादुरे, वैभव गुप्ता, श्रीपाद रिसालदार, राजेश बागडी, नवनीतसिंग तुली प्रामुख्याने उपस्थित होते. शहरात ‘मेट्रो’चे काम वेगात सुरू असून कामठी, कन्हान नदीपर्यंत ‘मेट्रो’चा विस्तार होणार आहे. उत्तर नागपुरमधील कळमना स्थानक हे सुंदर व भव्य राहणार आहे. त्यादृष्टीनेच या स्थानकाचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.१७०० कोटींच्या रिंगरोडचे काम सुरू आहे. कामठी-कळमना मार्गामुळे उत्तर नागपूरचा विकास होणार आहे. मी ज्यावेळी रस्ता बांधला तेव्हा जमिनी विकू नका, असे सांगितले होते. आज जमिनीचे दर वाढले आहे. पुढे हा रस्ता चार पदरी होणार असून त्यामुळे या भागाचे महत्त्व आणखी वाढेल. उत्तर नागपुरात कळमना, शांतिनगर, विनोबा भावे नगर भागात चौफेर विकास व्हावा व गरीब मुलांच्या हाताला काम देणे हेच माझे ध्येय आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात १३० ‘ग्रीन जिम’ सुरू करणार आहोत. या माध्यमातून शहराला सुंदर बनवायचे आहे. क्रीडा, शिक्षण, दळणवळण, पायाभूत सुविधा, रस्ते, सांस्कृतिक क्षेत्र सर्वच बाबींचा विकास झाला आहे. नागपूर जगातील सर्वात चांगले शहर झाले पाहिजे, असा मानस आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.

विविध संघटनांचे गडकरींना समर्थननितीन गडकरी यांना विविध संस्था व संघटनांनी समर्थन जाहीर केले आहे. अखिल भारतीय विश्वकर्मामय विकास मंडलचे अध्यक्ष विष्णुपंत मोरेकर,सचिव रमाकांत वरुडकर,कोषाध्यक्ष विजय खिरपुरकर,उपाध्यक्ष अशोक पातुरकर,उपाध्यक्ष सुरेंद्र निलटकर यांनी गडकरी यांच्या समर्थनार्थ पत्र लिहीले आहे. राजपूत समाज मंचचे अध्यक्ष डॉ कैलाशसिंह चौहान, सचिव रमेशसिंह ठाकूर,कोषाध्यक्ष शैलेषसिंह मौर्य यांनीदेखील गडकरी यांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे. सोबतच राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था(नाफ) ने देखील गडकरी यांना समर्थन दिले आहे. अध्यक्ष सी.वी.क्लोटी, कार्याध्यक्ष आर.वी.पोकाले,महासचिव दिलीप ढोले,उपाध्यक्ष वी.एन.श्रीवास्तव,एस.डी.ढोले यांनी गडकरी यांच्या समर्थनार्थ पत्र जारी केले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक