शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Corona Virus in Nagpur; उपराजधानीतील पॉझिटिव्ह रुग्ण अनेकांच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 10:28 IST

भाऊ कोरोनाबाधित असल्याची माहिती दडवून ठेवून एका पॅरालिसिसच्या रुग्णाने मेडिकलमधील एका सामान्य वॉर्डात दोन दिवस उपचार घेतले. या रुग्णाच्या संपर्कात मेडिकलचे नऊवर डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी व सामान्य रुग्णही आल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये उपचारादरम्यान दडवून ठेवली माहिती डॉक्टरांसह परिचारिका व रुग्णही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाऊ कोरोनाबाधित असल्याची माहिती दडवून ठेवून एका पॅरालिसिसच्या रुग्णाने मेडिकलमधील एका सामान्य वॉर्डात दोन दिवस उपचार घेतले. त्यापूर्वी त्याने एका खासगी हॉस्पिटलमध्येही उपचार घेतले. एमआरआयही काढला. हाच रुग्ण रविवारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. या रुग्णाच्या संपर्कात मेडिकलचे नऊवर डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी व सामान्य रुग्णही आल्याचे बोलले जात आहे. जर डॉक्टर पॉझिटिव्ह आल्यास तर मोठा फटका बसण्याची शक्यता मेडिकलमध्ये वर्तवली जात आहे.घरीच पॅरालिसिसचा झटका आल्याने ३८ वर्षीय संबंधित रुग्णाला जरीपटका येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच दिवशी एका खासगी केंद्रामधून ‘एमआरआय’ही काढण्यात आला. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे, २६ मार्च रोजी दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेला त्याचा ४२ वर्षीय भाऊ पॉझिटिव्ह आला. याची माहिती हॉस्पिटलला कळताच त्यांनी पॅरालिसिसच्या रुग्णाला मेडिकलमध्ये पाठविले. परंतु या रुग्णाने भाऊ पॉझिटिव्ह आल्याची माहिती मेडिकलच्या डॉक्टरांपासून लपवून ठेवली. मेडिकलच्या ‘ओपीडी’पासून ते त्याला भरती करण्यात आलेल्या सामान्य वॉर्डापर्यंत सामान्य पॅरालिसिसच्या रुग्णासारखेच त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु जेव्हा त्याच्या पॉझिटिव्ह भावाच्या नातेवाईकांची माहिती घेणे सुरू झाले, तेव्हा या रुग्णाचेही नाव समोर येताच मेडिकल प्रशासनाला धक्काच बसला. २८ मार्च रोजी या रुग्णाला सामान्य वॉर्डातून कोरोनाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती केले. याचा नमुना मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. रविवारी नमुनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली.नऊवर डॉक्टर संपर्कात?भाऊ पॉझिटिव्ह असल्याची माहिती लपवून ठेवल्याने मेडिकलमध्ये त्याच्यावर सामान्य रुग्णासारखे उपचार सुरू होते. सलग दोन दिवस तो मेडिसिनच्या एका वॉर्डात भरती होता. यादरम्यान मेडिसिनचे नऊवर डॉक्टर त्याच्या संपर्कात आले. यात एक सहयोगी प्राध्यापक डॉक्टरचाही समावेश आहे. शिवाय, काही परिचारिका, कर्मचारी व शेजारील रुग्णही संपर्कात आल्याची माहिती आहे. रविवारी या सर्वांचे नमुने तातडीने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.माहिती दडवून ठेवणे हा गुन्हाचकोरोना म्हणजे काय, आता हे सर्वांनाच माहीत झाले आहे. यामुळे रुग्णांनी आपल्या कुटुंबात याची बाधा झाल्याची माहिती डॉक्टरांपासून लपवून ठेवणे हा गुन्हाच ठरतो. ३८ वर्षीय पॅरालिसिसच्या रुग्णाने पहिल्याच दिवशी भाऊ पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले असते तरी उपचारात कुठलाही बदल झाला नसता. त्याला सामान्य वॉर्डऐवजी आयसोलेशन वॉर्डात भरती केले असते. उपचार करणाºया डॉक्टरांपासून ते परिचारिका व कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगली असती. परंतु रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी माहिती दडवल्याने एक मोठे संकट ओढावले आहे.- डॉ. राजेश गोसावी प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

- ‘लोकमत’ची भीती खरी ठरलीविदेशी किंवा राज्यांतर्गत प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्यांनी स्वत:हून डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करण्याचे भावनिक आवाहन ‘लोकमत’ने केले होते. याकडे दुर्लक्ष केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वर्तवली होती. या घटनेमुळे मात्र ही भीती खरी ठरली.

आता तरी जागे व्हा, माहिती दडवू नकाविदर्भात कोरोना विषाणूचा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात आला आहे. आता जर जागे न झाल्यास तर मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असल्यास विदेशातून व देशांतर्गत प्रवास करून आले असल्यास याची माहिती महानगरपालिकेला अवश्य द्या; शिवाय सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लगेच डॉक्टरांकडून तपासून घ्या. कुठलीही माहिती डॉक्टरांपासून किंवा आरोग्य यंत्रणेकडून दडवू नका. आता तरी जागे व्हा. आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घ्या, असे पुन्हा एकदा आवाहन ‘लोकमत’ने केले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस