शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात डिस्चार्जनंतर पुन्हा पॉझिटिव्ह : ६८ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:32 IST

कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला लक्षणे नसतील आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर रुग्णालयातून दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. त्यानुसार दोन रुग्णाला सुटी देण्यात आली असताना पुन्हा ते पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्देएकाचा मृत्यू, रुग्णसंख्या ३०२७

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला लक्षणे नसतील आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर रुग्णालयातून दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. त्यानुसार दोन रुग्णाला सुटी देण्यात आली असताना पुन्हा ते पॉझिटिव्ह आले. यात एक गर्भवती महिला तर एक पोलीस आहे. सोमवारी ६८ नव्या रुग्णांची भर तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ३०२७ झाली असून, मृतांची संख्या ६८ वर पोहचली आहे.नागपूर जिल्ह्यात सलग १४ दिवसांपासून रुग्णांची संख्या ५० वर जात आहे, तर आठ दिवसांपासून मृत्यूचे सत्र सुरू आहे. यातच रुग्णालयातून सुटी होऊन घरी गेलेले दोन रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. चार आठवड्यांपूर्वी मोमीनपुरा येथील २७ वर्षीय गर्भवती महिला कोविड पॉझिटिव्ह आली. मेयोत दाखल करून उपचार करण्यात आले. लक्षणे नसल्याने दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी ही महिला प्रसुतीसाठी मेयोत दाखल झाली असताना व कोविडची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. अशीच घटना आरपीटीएस येथील पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडली. १५ दिवसांपूर्वी त्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने मेयोत भरती करण्यात आले. दहाव्या दिवशी डिस्चार्जही देण्यात आला. सहज म्हणून रविवारी नमुना तपासला असता आज पॉझिटिव्ह आला. दोन्ही रुग्णांना कुठलीच लक्षणे नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.८३ वर रुग्ण आयसीयूमध्येमेडिकलमध्ये २३४ रुग्ण भरती असून, ५३ रुग्ण आयसीयूमध्ये भरती आहेत. यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मेयोमध्ये भरती असलेल्या २३१ रुग्णांमधून २० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. वाढत्या रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम व गंभीर लक्षणे असलेले रुग्णही दिसून येत आहेत. आज मेयोमधून ९, मेडिकलमधून १०, एम्समधून २, खासगी लॅबमधून १३, अ‍ॅण्टीजन चाचणीतून ३४ असे ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित ५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९३९ झाली आहे.या वसाहतीत आढळून आले रुग्णकमाल टॉकीज चौक परिसर १, साईनगर जयताळा १, एसबीआय कॉलनी आनंदनगर १, अहल्या देवी मंदिर परिसर धंतोली १, डब्ल्यूसीएल कॉलनी सिव्हिल लाईन्स १, माऊंट कॉर्मेल कॉन्व्हेंट अजनी १, हिमांशू प्लाझा कामगारनगर १, सेवासदन गांधीबाग १, टेलिकॉमनगर १, दिघोरी १, सोनेगाव २, शांतिनगर १ व चंद्रनगर १ असे १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मनपाकडे ही नोंद सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाली आहे.कामठीत पुन्हा १३ पॉझिटिव्हकामठी तालुक्यात पुन्हा १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तालुक्यात बाधितांची संख्या २०४ झाली आहे. बुटीबोरी जुनी वसाहतीमध्ये २४ वर्षांच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. बाधित मुलगा सुमारे ३०० वर लोकांच्या संपर्कात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कन्हानमध्ये पाच रुग्णांची भर पडली, बाधितांची संख्या २७ झाली आहे. कुही तालुक्यातील देवळी (कला) येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. कोंढाळी येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. ग्रामीणमध्ये आज २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले.संशयित : २९८९बाधित रुग्ण : ३०२७घरी सोडलेले : १९३९उपचार घेत असलेले रुग्ण : १०३३मृत्यू : ५४

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर