पोर्टल ठप्प, जमा नाही झालेत आयटी रिटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 12:25 AM2021-04-03T00:25:13+5:302021-04-03T00:27:35+5:30

Portal jammed, no IT returns वित्तीय वर्ष २०१९-२० करिता आयकर रिटर्न जमा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. पण या दिवशी आयकर विभागाचे पोर्टल दिवसभर ठप्प राहिल्याने आयटी रिटर्न जमा झाले नाहीत. त्यामुळे पेनॉल्टी न घेता आयकर विभागाने रिटर्न जमा करावेत, अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सने (एनसीसीएल) सरकारकडे केली आहे.

Portal jammed, no IT returns | पोर्टल ठप्प, जमा नाही झालेत आयटी रिटर्न

पोर्टल ठप्प, जमा नाही झालेत आयटी रिटर्न

Next
ठळक मुद्दे पेनॉल्टी न घेता रिटर्न जमा करण्याची एनसीसीएलची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : वित्तीय वर्ष २०१९-२० करिता आयकर रिटर्न जमा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. पण या दिवशी आयकर विभागाचे पोर्टल दिवसभर ठप्प राहिल्याने आयटी रिटर्न जमा झाले नाहीत. त्यामुळे पेनॉल्टी न घेता आयकर विभागाने रिटर्न जमा करावेत, अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सने (एनसीसीएल) सरकारकडे केली आहे.

पोर्टल ठप्प झाल्याने अनेक व्यापारी आयकर रिटर्न जमा करू शकले नाहीत. एनसीसीएलचे माजी अध्यक्ष सीए कैलाश जोगानी म्हणाले, करदात्यांनी दिवसभर पोर्टल सुरू होण्याची वाट पाहिली. ते सुरळीत न झाल्याने रिटर्न जमा करू शकलो नाहीत, असे मत अनेक व्यापारी आणि सीएंचे आहे. रिटर्न जमा न करण्याचे ठोस कारण असल्याने सरकारने या कामासाठी वेळ वाढवून द्यावी अथवा अशा करदात्यांना नोटीस देऊन रिटर्न स्वीकार करावेत. यावर कोणतीही पेनॉल्टी आकारू नये. अन्यथा यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होतील.

जोगानी म्हणाले, चेंबरने वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष मोदी यांना पत्र लिहून रिटर्न भरण्याची तारीख वाढविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे रिटर्न जमा न करू शकलेल्या व्यापाऱ्यांना मुदत मिळेल. त्यामुळे सरकारचे नुकसान न होता फायदाच होईल, शिवाय कायदेशीर अडचणी येणार नाहीत. सरकार एकीकडे ‘विवाद से विश्वास’ यासारखी योजना आणून वाद निकालात काढू इच्छिते तर दुसरीकडे दररोज नवीन वाद निर्माण करीत आहे. अलीकडचे आयकरात कर निर्धारणाकरिता लाखों प्रकरणे आयकर कलम १४८ अंतर्गत उघडली आहेत. त्याचे कर निर्धारण आयकर विभागाला याचवर्षी पूर्ण करायचे आहे.

आधारला पॅनसोबत जोडणी,अवधी वाढविण्याचे स्वागत

जोगानी म्हणाले, आधारला पॅनसोबत जोडणी करण्याची तारीख तीन महिने वाढवून ३० जून करण्याच्या निर्णयाचे चेंबरने स्वागत केले आहे. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल. आधारला पॅनसोबत जोडणी केली नसती तर पॅनची ग्राह्यता १ एप्रिलला निरस्त झाली असतील. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. आता व्यापारी आणि करदात्यांनी तातडीने आधारला पॅनसोबत जोडणी करावी आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन चेंबरने केले आहे.

Web Title: Portal jammed, no IT returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.