शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोेर्टेबल ऑक्सिजन यंत्राची नागपूर जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:51 IST

व्यावसायिक स्तरावर हॉस्पिटलला लागणारे ऑक्सिजन सिलिंडर मोठे असते. पण क्वारंटाईन असलेले वा नसलेल्या लोकांना आता घरगुती स्तरावर ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे पोर्टेबल कॅनला मागणी वाढली आहे.

ठळक मुद्दे घरगुती स्तरावर मागणी वाढली५०० ते ६०० रुपयात यंत्रे बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर कोरोना रुग्णांसाठी घरगुती स्तरावर ६ ते १२ लिटर क्षमतेचे पोर्टेबल ऑक्सिजन यंत्र अर्थात मिनी ऑक्सिजन सिलिंडर कॅनची मागणी वाढली आहे. हे सिलिंडर दोन महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. लोक आरोग्यप्रति सजग झाल्याने आणि मागणी वाढल्याने जिल्ह्यात कोटीची उलाढाल झाल्याची माहिती आहे.व्यावसायिक स्तरावर हॉस्पिटलला लागणारे ऑक्सिजन सिलिंडर मोठे असते. पण क्वारंटाईन असलेले वा नसलेल्या लोकांना आता घरगुती स्तरावर ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे पोर्टेबल कॅनला मागणी वाढली आहेत. हे कॅन मुंबई, दिल्ली आणि अन्य राज्यातून नागपुरात विक्रीला येत आहे. विक्रेते शरीरातील ऑक्सिजनचा स्तर मोजण्याच्या यंत्रासह ऑक्सिजन कॅनची विक्री करीत आहेत. मागणी वाढल्याने कॅनचा तुटवडा होऊ लागला आहे. याशिवाय ऑनलाईन स्तरावर लोकांकडून मागणी वाढली आहे. जिल्ह्यात १० हजारांच्या आसपास ऑक्सिजन कॅनची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अनेक सामाजिक संस्था ऑक्झिमीटरसोबत कॅनचे वितरण करीत आहेत. दिल्ली आणि मुंबई येथील कंपन्यांनी कॅनचे उत्पादन वाढविले आहे. त्याचा दर्जाही चांगला आहे. ऑक्सिजन कॅनचा उपयोग कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक विक्रेते घरी येऊन देत आहेत. सहज नेता येणारी आणि घरगुती वापराच्या कॅनला लोकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. त्या प्रमाणात पुरवठाही वाढला आहे.डॉ. प्रसाद वरदळकर म्हणाले, सद्य स्थितीत रुग्णालयात उपचाराचा खर्च वाढला आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने आणि होम क्वारंटाईन असणारे रुग्ण या पोर्टेबल ऑक्सिजन कॅन आणि ऑक्झिमीटरचा उपयोग करीत आहेत. कॅन वापरणे सोपे असून सहजपणे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. याच्या उपयोगाची पद्धत अत्यंत सोपी आहे. अनेकांची तब्येत सुधारल्याचे दिसून आले आहे. लोक आरोग्यप्रति जागरूक झाल्याने पुढे ऑक्सिजन कॅनची मागणी वाढणार आहे.घरगुती स्तरावर पोर्टेबल ऑक्सिजन कॅनचा उपयोग करणे सोपे आहे. याद्वारे फुफ्फुस आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ज्यांना थकवा येतो, त्यांच्यासाठीही कॅन उपयोगी आहे. आकस्मिक प्रसंगी कॅनचा उपयोग करता येतो. कॅनमध्ये ९९.९ टक्के शुद्ध ऑक्सिजन असतो. आता हे कॅन मेडिकल किटमध्ये ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. हे कॅन दोन वर्षांपर्यंत उपयोगात येते. ते रिफिल करता येते. १२ लिटरची किंमत ६५० रुपये आहे.प्रांजल तिडके, एम.फार्म.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस