शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पीओपी बाप्पा : मनपा प्रशासन झोपले आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 21:45 IST

महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस(पीओपी)’च्या मूर्ती विक्रीस बंदी घातली गेली आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने, मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सर्रास ‘पीओपी बाप्पा’ विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देविक्रेत्यांकडून केली जातेय पर्यावरण परंपरेची विटंबनासर्रास विकल्या जात आहेत बंदी घातलेल्या मूर्तीकारवाई केवळ मनपाच्या दस्तऐवजातच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संरक्षणाची बोंब ठोकायची, उपाययोजना करायच्या आणि कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करीत असल्याचा बनाव करायचा... एवढ्याच गोष्टी स्थानिक प्रशासन व्यवस्थेकडून सातत्याने कानावर पडत असल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात स्वत:च केलेल्या कायद्याला बगल देण्याचा प्रताप प्रशासनिक व्यवस्थेचे कर्मचारी करीत असल्याचे उघड उघड दिसून येते. महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस(पीओपी)’च्या मूर्ती विक्रीस बंदी घातली गेली आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने, मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सर्रास ‘पीओपी बाप्पा’ विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांकडून पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या पीओपी मूर्तींना बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. त्यावर बरेच वर्षे राजकीय आणि प्रशासनिक व्यवस्थेमध्ये चर्चा-चिंतन करण्यात येऊन गेल्या वर्षीपासून शहरात केवळ मातीच्याच मूर्ती विकल्या जातील, असा आदेश काढण्यात आला. शिवाय, पीओपी मूर्तींना शहरात प्रवेशच दिला जाणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या. मात्र, या दोन्ही आदेशांना विक्रेत्यांनी केराची टोपली दाखविली असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. शिवाय, अशा मूर्ती जप्त केल्या जात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, हे सगळे बोलणे कार्यालयातील दस्तऐवजामध्येच अंकित केले जाते की काय... असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या चितारओळीमध्ये काही चार-पाच पारंपरिक मूर्तिकार वगळता इतर हंगामी व्यावसायिकांनी भाड्याच्या दुकानांमध्ये महापालिकेच्या नाकावर लिंबू टिच्चून पीओपीचा बाजार भरवला असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते. विशेष म्हणजे, या मूर्तींना मातीची किंवा पीओपीची अशा सूचना चिकटवण्यात आलेल्या नाही. बिच्चारा भाविक बाप्पावरील श्रद्धेपाटी सुबक, सुरेख आणि त्याच्या मनातील भाव अंकित करणाऱ्या मूर्ती मातीच्या म्हणून खरेदी करण्यावर भर देत आहेत. जेथे स्वत: प्रशासनच बेकायदेशीर गोष्टींना अभय देत आहे, तेथे सामान्य नागरिकांकडून कायदा पाळला जाईल.. अशी अपेक्षा प्रशासनाने तरी कशी करावी, हा प्रमुख प्रश्न आहे.हंगामी व्यावसायिक मज्जेत अन् पारंपरिक कलावंत मूर्च्छितावस्थेत!चितारओळीमध्ये जेवढी घरे तेवढेच मूर्तिकार असा समज आहे. त्यातील काही मूर्तिकार स्वत: माती आणून किंवा कुंभारांकडून बनविलेल्या मातीच्या मूर्ती आणून पारंपरिकरीत्या मूर्तींची विक्री करतात. मात्र, जे मूर्तिकार नाहीत, त्यांच्या घरी असलेल्या मोकळ्या जागेत भलीमोठी रक्कम घेऊन दहा दिवसांसाठी हंगामी मूर्ती व्यावसायिकांना ती जागा देत असतात. याच जागेमध्ये हे हंगामी व्यावसायिक पीओपी मूर्तींची सर्रास विक्री करीत असल्याचे दिसून येते. यामुळे मात्र पारंपरिक मातीकला जोपासणाऱ्या कलावंतांची स्थिती मूर्च्छितावस्था आल्यासारखी झाल्याचे दिसून येते.कारवाई कधी करणार?गेल्या काही वर्षांपासून पीओपीची मूर्ती नको अन्यथा कारवाई, असा आदेश महापालिका प्रशासनाकडून काढला गेला आहे. दरवर्षी श्रीगणेशोत्सवाच्या काळात कारवाई केली जात असते. तरीदेखील पीओपी मूर्तींची विक्री थांबलेली दिसत नाही. उलट, दरवर्षी नवनव्या विक्रेत्यांची भर पडत असून, सर्व विक्रेते बाहेरून आलेल्या पीओपीच्या आयातीत मूर्तींची सर्रास विक्री करीत असल्याचे स्पष्ट होते. यावरून प्रशासन स्वत:च कारवाईसाठी उदासीन असून, स्वत:च केलेला कायदा पाळण्यास असमर्थ दिसून येत आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका