शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

इलेक्ट्रिक कारमुळे प्रदूषणमुक्त क्रांती

By admin | Updated: May 27, 2017 02:47 IST

देशात दरवर्षी सात लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करण्यात येते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो.

नितीन गडकरी : ओला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात दरवर्षी सात लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करण्यात येते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो. पण प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक कारमुळे कच्च्या तेलाची आयात कमी होऊन देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि प्रदूषणमुक्त क्रांती येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मल्टी मॉडेल वाहन प्रकल्पाचे आणि ओला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र कंपनी आणि ओला यांच्या विशेष सहयोगाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. व्यासपीठावर वाहतूक मंत्री दिवाकर रावते, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयनका, ओला कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल, कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडच्या उपाध्यक्ष सुलजा फिरोदिया, टाटा मोटर्सचे आनंदकुमार, माजी मंत्री दत्ता मेघे, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. आशिष देशमुख, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. सुनील केदार, रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव अभय दामले, शासनाच्या वाहतूक विभागाचे प्रधान सचिव मनोज सैनिक, विभागीय आयुक्त अनुप कुमार, राज्याचे वाहतूक आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसकर, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, वाहतुकीच्या पायाभूत सुविधा आणि इंधनावरील अवलंबत्व यावर पुनर्विचार गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात स्वीकृती झाली तरच बदल घडून येईल. २०३० पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावण्याचे लक्ष्य पूर्ण होईल. ओला आणि महिन्द्रसारख्या कंपन्या प्रशासनाचा दृष्टिकोन पुढे नेत आहे. प्रदूषणमुक्त वाहनांना प्राधान्य देण्यासाठी लंडन फॉर ट्रान्सपोर्ट या सरकारी कंपनीसोबत करार केल्याचे त्यांनी सांगितले. बेरोजगारांना काम मिळण्यासाठी राज्य सरकारने चार्जिंग स्टेशनला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. बसस्थानक विमानतळासारखे करणार गरीबाला वातानाकूलित व्यवस्था मिळावी, याकरिता बसस्थानके विमानतळासारखी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ओला कंपन्यांनी कारवर नागपूर जिल्हा आणि विदर्भातील ड्रायव्हरला कामावर ठेवले तरच आम्ही मदत करू, असे त्यांनी स्पष्ट केले. इलेक्ट्रिक कारमुळे रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक कारमुळे प्रदूषण कमी होणार : मुख्यमंत्री वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक कारवर येणार असल्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे खऱ्या अर्थाने सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे काम नितीन गडकरी करीत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. युवकांना चार्जिंग स्टेशन देण्यासाठी राज्य सरकार धोरण तयार करीत आहे. बेरोजगारांना स्टेशन देण्यासाठी नवीन दालन सुरू करणार आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांना वाईट दिवस येतील. कौशल्य विकासामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सर्वांना विकासाच्या प्रक्रियेत संधी मिळेल. प्रदूषणमुक्त शहर होण्याचा मान नागपूर शहराला मिळणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये हे पहिले पाऊल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात १७ बसपोर्ट तयार करणार राज्यात १७ बसपोर्ट नव्याने तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इतर बसपोर्टसाठी केंद्राच्या परिवहन खात्यासोबत काम करणार आहे. महाराष्ट्र राज्य भविष्यात एक आदर्श राज्य म्हणून इतरांसोबत उभे राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील ११.२० कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी तुमच्यासमोर उभा असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले. बावनकुळे म्हणाले, या प्रकल्पाचा फायदा ऊर्जा खात्याला होणार आहे. राज्यात अतिरिक्त वीज आहे. त्यामुळे खात्याला विजेसाठी ग्राहक मिळेल. राज्यात इलेक्ट्रिक अभियंत्यांना चार्जिंग स्टेशन देण्याची मागणी त्यांनी केली. टाटा मोटर्सचे आनंदकुमार यांनी इलेक्ट्रिकवर धावणारी बस ५० दिवसांसाठी दीनदयाल इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटरला दिली. यावेळी महापौर नंदा जिचकार, अभय दामले, डॉ. पवन गोयनका आणि भावेश अग्रवाल यांनी प्रकल्प आणि कंपनीच्या उद्दिष्टांची माहिती दिली. संचालन रेणुका देशकर यांनी तर सतीश सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.