शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:19 IST

आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते लुळे, लंगडे व बहिरे झाले आहेत, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘दक्षिणायन’च्या ‘समास-२०१८’ अंतर्गत जाहीर सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते लुळे, लंगडे व बहिरे झाले आहेत, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ‘दक्षिणायन’च्या ‘समास-२०१८’ या अभियानांतर्गत मंगळवारी आयोजित जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.काँग्रेसनगर येथील धनवटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे हे होते. शिवाय महात्मा गांधी यांचे नातू व इतिहासतज्ज्ञ राजमोहन गांधी, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, विलास मुत्तेमवार, भालचंद्र कानगो, धनाजी गुरव, के.के.चक्रवर्ती, दामोदर मौझो, प्रज्ञा दया पवार, डॉ.बबन तायवाडे, डॉ.प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यघटनेनुसार सर्वांना धर्म पाळण्याचा अधिकार आहे. मात्र राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा कुठलाही धर्म नाही. काही संघटनांनी संविधानाला विरोध केला होता व त्यांचा आताही विरोध आहे. त्यांच्याशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. राजकीय लढाई लढून काहीही उपयोग होणार नाही. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत देशात मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी, ओबीसी ‘टार्गेट’ होते. परंतु ‘करणी सेने’च्या निमित्ताने हे भांडण आता सवर्णांच्या दारात पोहोचले आहे. परंतु आता देशात मूलभूत लढाईची सुरुवात झाली आहे व सर्वांनी यात सहभागी व्हायला हवे, असे प्रतिपादन अ‍ॅड.आंबेडकर यांनी केले. डॉ.गणेश देवी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.कट्टरतावादाला आंबेडकरवाद्यांनी थारा देऊ नयेदेशात आजच्या तारखेत अघोषित आणीबाणी असून, घोषित एकाधिकारशाहीचे चित्र दिसून येत आहे. दडपशाहीचे वातावरण असून सामान्य जनतेच्या मनात रोष आहे. पद्म पुरस्कारांची निवड करताना सरकार सर्वसमावेशक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला. परंतु ती धूळफेकच आहे. कट्टरतावाद वाढविण्यावर सरकारचा भर आहे. अशा कट्टरतावादाला आंबेडकरवाद्यांनी थारा देऊ नये.-प्रज्ञा दया पवार, प्राध्यापिकाजनतेमध्ये उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्नदेशात नेमका कुठला व कशा पद्धतीने संघर्ष सुरू आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा उपयोग करण्यात येत आहे. जनतेमध्ये उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणण्यात येत आहे. मूठभर लोकांच्या हाती विकासाची सूत्रे सोपविण्यात येत आहे. जनतेनेच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.-भालचंद्र कानगो, राज्य सरचिटणीस, भाकपही जागे होण्याची वेळगेल्या तीन वर्षांपासून देशात वेगळेच वातावरण असून गुलामगिरीचा नवा चक्रव्यूह निर्माण झाला आहे. आताचे असोत किंवा अगोदरचे सत्ताधारी, सर्वच लोक पुरोगामी प्रवाहांसोबत शत्रूसारखेच वागत आले आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा देत केवळ आपल्या पोळ्या शेकण्याचे काम केले. मात्र आता जनतेने जागे होण्याची वेळ आली आहे.-धनाजी गुरव,मौन तोडले पाहिजेजातीपातीमध्ये भेदभाव करणे हे संविधानाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधातच आहे. असे प्रयत्न करणारे लोक हे संविधानविरोधीच आहे. संविधानाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांना न्यायालयात खेचायला हवे. आता मौन तोडले पाहिजे.-के.के.चक्रवर्तीसंविधानाचे रक्षण झाले पाहिजेदेशात सत्ताबदल झाल्यापासून जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशाच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या संविधानासोबत छेडछाड करण्याची भाषा केंद्रातील मंत्री करतात. त्यामुळे पुढील धोक्यांची सूचना मिळते आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.-दामोदर मौझो

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर