शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी, मात्र देशाचे नाव खराब करू नये; संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 22:13 IST

Nagpur News नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले.

नागपूर : राजकारणाचा स्तर घसरत असल्याची चर्चा समाजात होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील राजकारण्यांच्या बोलबच्चनगिरीवर परखड भाष्य केले आहे. राजकारणात विविध पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा असतेच. मात्र त्याचीदेखील मर्यादा असते याचे भान ठेवायला हवी. नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा. मात्र तो विवेक काही राजकारण बाळगत नसल्याचे चित्र आहे. यामुळे जनतेमध्ये चुकीचे चित्र जात आहे, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला कोल्हापूर येथील कणेरीतील श्री सिद्धगिरी संस्थान मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या देशात विविधता असूनदेखील एकता कायम राहिली आहे. मात्र देशातील अनेक ठिकाणी अंतर्गत वाददेखील आहेत. भाषा, पंथ-संप्रदाय, सवलतींवरून वाद होत असून लोक पापसातच हिंसा करत आहेत. आपण शत्रूंना आपले बळ न दाखवता आपापसात लढत आहोत. आपण एक देश आहोत याचा विसर पडतो आहे. याला प्रोत्साहन देणारे अनेक लोक आहे व समाजात विद्वेष उत्पन्न करण्याची संधी ते शोधतच असतात. देशाची अखंडता कायम ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दोषारोपण करून काहीच साध्य होणार नाही याचे भान राजकारण्यांनी बाळगायला हवे, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया हेदेखील उपस्थित होते. यावेळी संघ स्वयंसेवकांनी विविध शारीरिक कवायती, योग, नियुद्ध यांचे सादरीकरण केले.

-भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- कोरोना, आर्थिक संकटात भारताने चांगली कामगिरी केली.- आपल्या देशाला वास्तवात प्रगतीसोबत ज्या जागृतीची आवश्यकता होती, त्या जागृतीला आणण्याचा प्रयत्न होत आहे,- आपल्या देशात जातीपातींवरून अन्याय झाला आहे. त्यांचे कर्ज आपल्याला चुकवावेच लागेल.- लहान लहान कारणांवरून एकमेकांशी संघर्ष करणे अयोग्य. सर्वांनी संयम बाळगला पाहिजे.- शॉर्टकटने दुःख विसरण्याचा प्रयत्न केल्या जातो व त्यातूनच ड्रग्ज, मद्याचे व्यसन लागते.- पर्यावरणाप्रति अपूर्ण दृष्टीकोन घेऊन भारतच नव्हे तर जगातील लोकांनी मार्गक्रमण केले. याचा फटका बसतो आहे.- जग भारताकडून नव्या दिशेची अपेक्षा ठेवत आहे. विवाद नव्हे तर संवादावर भर द्यावा लागेल.

-वैभवशाली संस्कृतीचे विस्मरण ही मोठी समस्यादेशाच्या सांस्कृतिक परंपरेचे जगातील इतर देशांतील लोकांनी आचरण केले. मात्र आपल्या लोकांनाच याचा काहीसा विसर पडत गेला. लोकसंख्या ही देशाची समस्या नाही. तर आपली परंपरा व वैभवशाली संस्कृतीचे विस्मरण ही मोठी समस्या आहे. विस्मरणात चाललेल्या आपल्या परंपरेची आठवण समाजाला करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले. आपल्या देशाला ध्वस्त करण्यासाठी विविध लोक तरुणांना व्यसनी बनवत आहेत. यात विदेशी तत्वांचादेखील समावेश आहे. त्यांना संघाच्या संस्कारांच्या माध्यमातूनच थांबविल्या जाऊ शकते, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ