शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षाने आपले स्वत:च हॉस्पिटल उभे करावे : डॉ. बोधनकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:42 IST

कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी खासगी डॉक्टरांना जबाबदार धरले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा हा प्रकार थांबवायला हवा, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी खासगी डॉक्टरांना जबाबदार धरले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचा हा प्रकार थांबवायला हवा, असे मत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ज्या सामान्य कार्यकर्त्याचे संपूर्ण आयुष्य पक्षासाठी काम करण्यात गेले, त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांसाठी गरजेच्या वेळी किमान एखादी खाट आणि आरोग्य सेवा तरी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने जिल्हा पातळीवर आपले स्वत:चे एक हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे.‘लोकमत’शी बोलताना डॉ. बोधनकर यांनी मेयो, मेडिकलच्या वास्तव स्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ही दोन्ही रुग्णालये गरीब व सामान्य रुग्णांसाठी आशेचे केंद्र आहे. परंतु स्थापनेनंतर या रुग्णालयाच्या विकासाकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. यामुळे ८० टक्के रुग्णांचा भार खासगी हॉस्पिटलना सांभाळावा लागतो आहे. आजही कोणी लोकप्रतिनिधी आजारी पडला तर त्यांची धाव खासगी हॉस्पिटलकडेच असते. सध्याच्या स्थितीत कोविड पॉझिटिव्ह आलेले नेते खासगीमध्येच उपचार घेताना दिसून येत आहेत. यावरून शासकीय रुग्णालयाची व्यथा दिसून येते. सध्या कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीयसह खासगीमध्ये खाट मिळणे कठीण होत चालले आहे. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नेत्यांचीही दमछाक होत असल्याचे चित्र आहे. भविष्यात असे होऊ नये म्हणून, आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. जसे निवडणूक आले की, आपल्या पक्षाचे कार्यालय हे मतदारांची सेवा करण्यासाठी दिले जाते, तसेच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे हॉस्पिटल जरूर बांधावे. शिवसेना हॉस्पिटल, राष्ट्रवादी हॉस्पिटल, काँग्रेस हॉस्पिटल, भाजप हॉस्पिटल, मनसे हॉस्पिटल, शेकाप हॉस्पिटल, आरपीआय हॉस्पिटल, वंचित बहुजन हॉस्पिटल, एमआयएम हॉस्पिटल, बसपा हॉस्पिटल, प्रहार हॉस्पिटल, आम आदमी हॉस्पिटल उभे करावे. ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात असे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज सर्व पक्षांचे हॉस्पिटल स्थापन होतील. त्यांच्या कार्यकर्त्यांना व गोरगरिबांना मोफत उपचार उपलब्ध होतील. तो दिवस भारतीय राजकारणातील खरा सुवर्ण दिवस असेल. राजकीय पक्षांना, खरेच मतदारांची काळजी असेल तर कोरोना हॉस्पिटल उभारून सेवा करून दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल